Gondia News: गोंदियातील जोडप्याच्या प्रेमकहाणीचा डोळे पाणावणारा शेवट, पतीच्या निधनानंतर पत्नीनेही प्राण सोडले
Gondia News: पतीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच त्यांची प्रकृती अचानक खालावली. काही वेळातच त्यांनीही अखेरचा श्वास घेत पतीच्या पाठोपाठ जगाचा निरोप घेतला.

गोंदिया : लग्नबंधनात अडकताना आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याची शपथ घेतली जाते. तीच शपथ जपल्यासारखे एका वृद्ध दांपत्याने अवघ्या एका दिवसाच्या (Gondia News) अंतराने अखेरचा श्वास घेतला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सोविंदा गणपत बोरकर (वय ८०) आणि त्यांची पत्नी अंजनाबाई बोरकर (वय ६५) यांनी आयुष्यभर सुख-दुःखात खांद्याला खांदा लावून संसार उभारला. प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देताना त्यांनी एकमेकांनाच आधार मानले. उतार (Gondia News) वयात दोघेही परस्परांचेच बळ होते. १२ फेब्रुवारी रोजी सोविंदा बोरकर यांचे निधन झाले. पतीच्या जाण्याने अंजनाबाई मनोमन कोसळल्या. हा आघात त्या सहन करू शकल्या नाहीत. १३ फेब्रुवारी रोजी पतीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच त्यांची प्रकृती अचानक खालावली. काही वेळातच त्यांनीही अखेरचा श्वास घेत पतीच्या पाठोपाठ जगाचा निरोप घेतला.(Gondia News)
वृद्ध दांपत्याने एकापाठोपाठ प्राण सोडले
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील गिरोला गावात घडलेल्या घटनेमुळे अनेकांचे डोळे पाणावले आहेत. एका वृद्ध दांपत्याने एकापाठोपाठ प्राण सोडले. या धक्कादायक घटनेमुळे अनेकांकडून हळहळ होत आहे. सोविंदा गोविंदा बोरकर (80) व त्यांच्या पत्नी अंजनाबाई बोरकर हे वृद्धपणाच्या काळात दोघेही एकमेकांचे आधार झाले. मात्र 12 फेब्रुवारीला गोविंदा यांचे निधन झाले. हा धक्का अंजनाबाई यांच्यासाठी मोठा आघात होता.
पतीच्या निधनामुळे त्या मनातून हादरून गेल्या. हा दुःखवियोग त्या पचवू शकल्या नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 तारखेला पतीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच अंजनाबाई यांचीही प्रकृती अचानकपणे खालावली. त्या अत्यावस्थ झाल्या. अशातच त्यांनीही पतीच्या पाठोपाठ या जगाचा निरोप घेतला. आयुष्याची 50 वर्षे एकमेकांच्या साथीने घालविल्यावर जगाचा निरोपही सोबतच घेणाऱ्या या दांपत्यावर अंत्यसंस्कारही सोबतच करण्यात आले. नातलग आधीपासूनच उपस्थित होते. त्यामुळे या दोघांनाही एकाच वेळी नातलगांनी अखेरचा निरोप दिला. हा संपूर्ण प्रकार गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील गिरोला गावात घडला. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.
























