Gondia Leopard Attack: घराच्या अंगणात चुलीजवळ बसलेल्या चिमुकल्यावर दबा धरून बसलेल्या बिबटने अचानक हल्ला (Leopard Attack) केल्याचीघटनाघडलीय. याहल्ल्यात चिमुकल्याचा जागीच मृत्यू झालाय. रियांष रहांगडाले असेया चारवर्षीय मृतक चिमुकल्याचे नाव आहे. गोंदियाच्या (Gondia Leopard Attack) तिरोडा तालुक्यातील खडकी डोंगरगाव येथे आज (9 जानेवारी) सकाळच्यासुमारासहिघटनाघडलीय. तर घटनेनंतर खडकी डोंगरगाव येथील ग्रामस्थांनी वनविभागावर चांगलाच रोष व्यक्त केला असून या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे.
विशेष म्हणजे दोन महिन्यापूर्वीच तिरोडा तालुक्यातील इंदुरा गावात 9 वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला केल्याने तिचा देखील मृत्यू झाला होता. त्यामुळे वारंवार बिबट्याचे हल्ले होत असल्याने तिरोडा तालुक्यात सर्वत्र बिबट्याची दहशत बघायला मिळत आहे. दरम्यान, याप्रकरणी ग्रामस्थांनी वनविभागावर चांगलाच रोष व्यक्त केलाय.
Bhandara News: दुर्गा मातेच्या मंदिर परिसरात दोन अस्वलांचा मुक्तसंचार; लाखांदूरच्या चप्राड पहाडीवरील घटना
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील चप्राड पहाडीवरील दुर्गा मातेच्या मंदिर परिसरात दोन अस्वलाच्या मुक्तसंचार सीसीटीव्ही कॅमेरात चित्रीत झाली आहे. निसर्गरम्य सौंदर्यानं नटलेल्या आणि भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मंदिरात दररोज शेकडो भाविक मातेच्या दर्शनासाठी येतं असतात. अशातच रात्रीच्या सुमारास हे दोन अस्वल मंदिर परिसरात आढळून आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
दरम्यान, 15 दिवसांपूर्वी याच भागात एक अस्वल नागरिकांना दिसून आलं होतं, त्यानंतर आता ही अस्वलाची जोडी दिसून आल्यानं वन विभागानं इथं सुरक्षा वाढवावी, आणि अस्वलांना जंगल परिसरात हुसकावून लावावं, अशी मागणी होतं आहे. यापूर्वी मंदिर परिसरात बिबट्याचा वावर बघायला मिळतं होता. मंदिराभोवती झाडी झुडपी असून त्यात हे अस्वल दबा धरून राहिल्यास आणि कुणावर अचानक हल्ला केल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळं भाविकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
Gondia News: गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील 3 तरुणांचा वेगवेगळ्या अपघातात मृत्यू
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील 3 युवकांचा वेगवेगळ्या घटनेत एकाच दिवशी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ताडगांव येथील संदिप नाकाडे याचा अर्जुनी-मोरगाव रेल्वे स्टेशन परिसरात गोंदिया-चंद्रपुरकडे जाणा-या मालवाहू रेल्वे गाडीच्या धडकेत मृत्यू झाला... तर दुस-या घटनेत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धाबेटेकडी आदर्श येथील नंदेश्वर कापगते या युवकाचा शेतातील विद्युत डिपी जवळ शाॅक लागुन जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली. तर तिस-या घटनेत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मोरगांव येथील दुर्गेश चौधरी हा युवक काही कामानिमित्त भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील नातेवाईकाकडे दुचाकीने गेला होता.
दरम्यान साकोली तालुक्यातील चारगांव फाट्याजवळ ट्रक व दुचाकी च्या अपघातात दुर्गेश चौधरी याचा जागीच ठार झाला. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील या तिन्ही घटनांमुळे तालुक्यासह तिन्ही गावात शोककळा पसरली आहे.
आणखी वाचा
