Gondia News: भाजप आमदाराच्या लेकीचं शासकीय आदिवासी आश्रम शाळेतून शिक्षण; पालकांनाही पुढाकार घेण्याचे आवाहन
Sanjay Puram : आमगाव देवरी विधानसभेचे भाजप आमदार संजय पुराम यांनी मात्र संपूर्ण महाराष्ट्रासमोर एक उत्तम उदाहरण घालून देत आपल्या मुलीला आदिवासी विभागाच्या शासकीय आश्रम शाळेमध्ये प्रवेश दिला आहे.

Gondia News: एकीकडे महाराष्ट्रामध्ये सर्वत्र इंग्रजी माध्यमांच्या शाळांची मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना अनेक अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी हे आपापल्या मुलांना इंग्रजी शाळेकडे प्रवेश करण्यासाठी मोठे पैसे खर्च करतात. परंतु आमगाव देवरी विधानसभेचे भाजप आमदार संजय पुराम (Sanjay Puram) यांनी मात्र संपूर्ण महाराष्ट्रासमोर एक उत्तम उदाहरण घालून देत आपल्या मुलीला आदिवासी विभागाच्या शासकीय आश्रम शाळेमध्ये प्रवेश दिला आहे. सोबतच आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्यासाठी पुढे यावं यासाठी संजय पूराम यांनी पुढाकार घेत आवाहन केलं आहे.
पालकांनाही पुढाकार घेण्याचे आवाहन
दरम्यान, कुठल्याही गावातील छोटासा पदधिकारी ही चांगलं शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून खाजगी शाळेत आपल्या पाल्याचे नाव दाखल करतात आणि त्यांच्या मागे लाखो रुपये खर्च करत असतात. असे असताना आमगाव-देवरी विधानसभेचे आमदार संजय पुराम यांनी महाराष्ट्रात एक उत्तम उदाहरण निर्माण करत आपल्या राहत्या गावी पुराडा ढीवरीनटोला येथील आदिवासी विकास विभाग एकात्मिक प्रकल्प अंतर्गत आदिवासी आश्रम शाळा पुराडा येथे आपली मुलगी समृद्धी संजय पुराम हिला आठव्या वर्गात दाखिला दिला आहे. एक जनप्रतिनिधी म्हणून आदिवासी विभागाच्या शासकीय आश्रम शाळेमध्ये ही उत्तम शिक्षण दिलं जाऊ शकतं, त्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन ही भाजप आमदार संजय पुराम यांनी केलं आहे.
दूध संघ निवडणुकीचा निकाल जाहीर
तब्बल नऊ वर्षानंतर झालेल्या सहकार क्षेत्रातील दूध संघाची निवडणूक निकाल घोषित झाला. या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताधारी भाजपला हाताशी धरून ही निवडणूक लढवली. तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेने काँग्रेससोबत हात मिळवणी करून ही निवडणूक लढविली. 169 मतदार असलेल्या या निवडणुकीतून 12 संचालकांना निवडून द्यायचे होते. निवडणुकीसाठी 25 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. सायंकाळी या निवडणुकीचा निकाल घोषित झाला. यात शिंदे शिवसेना आणि काँग्रेस आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलचे सहा संचालक निवडून आलेत. तर भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सहकार विकास पॅनलचे सहा संचालक निवडून आले.
या निवडणुकीत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. दोन्ही पॅनलचे प्रत्येकी सहा संचालक निवडून आल्याने अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आता संचालकांची पळवापळवी आणि आर्थिक घोडेबाजार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत मागील 14 वर्षांपासून दूध संघाचे अध्यक्ष असलेले रामलाल चौधरी यांच्यासह विनायक बुरडे आणि सदाशिव वलथरे या सहकार क्षेत्रातील दिग्गजांचा पराभव झाला. तर, खासदार डॉ प्रशांत पडोळे यांचे लहान बंधू विवेक पाटोळे आणि विलास काटेखाये या दिग्गजांनी विजय मिळविला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या


















