Gondia Food Poisoning : लग्नाच्या जेवणातून 55 ते 60 जणांना विषबाधा; 4 जणांची प्रकृती चिंताजनक, गोंदियाच्या गोरेगावातील घटना
Gondia Food Poisoning : लग्नाच्या जेवनातून 55 ते 60 लोकांना विषबाधा झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील बबई येथे घडली आहे.

Gondia Food Poisoning : लग्नाच्या जेवनातून 55 ते 60 लोकांना विषबाधा झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील बबई येथे घडली आहे. गोरेगाव तालुक्यातील बबई येथील केशोवराव बिसेन यांच्याकडे लग्न समारंभ होतं. या लग्न समारंभातून जवळपास 55 ते 60 लोकांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये 8 बालकांचा समावेश असून चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पुढे आली आहे.
दरम्यान, विषबाधा झालेल्या 26 लोकांवर गोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयात तर उर्वरित लोकांवर प्राथमिक आरोग्य केंद्र व खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तर उर्वरित 17 लोकांवर गोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी दिली आहे. मात्र अचानक विषबाधा झाल्याच्या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
अपघात ग्रस्त क्रेटा कारमध्ये सापडली 70 लाखांची संशयस्पद रोकड
शेगाव-खामगाव मार्गावर काल (5 एप्रिल) सायंकाळी क्रेटा कार आणि दुचाकीत झालेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर अपघात स्थळी पोलीस पोहोचले व त्यांनी क्रेटा कार मधील चालक व त्याचा सहकारी यांना ताब्यात घेतलं वाहनाची तपासणी केली असता अपघातग्रस्त क्रेटा गाडीत दोन पोत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड असल्याचे दिसून आलं. पोलिसांनी तात्काळ नागपूर आयकर विभागाला याबाबत माहिती दिली व ही रोकड तपासण्यात आली असता, ती 70 लाखांची आढळली. या प्रकरणी पोलिसांनी अपघातग्रस्त क्रेटा चालक व त्याचा सहकाऱ्यांना ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी पोलीस करत आहेत.
धरणाच्या कालव्यात वाहून गेलेल्या मुलाचा अखेर मृतदेहच गवसला
मित्रांसोबत आंघोळीसाठी गेला असताना कालव्यात वाहून गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा अखेर मृतदेहच गवसला आहे. आर्यन शहारे (१४) असे मृतक मुलाचे नाव आहे. मृतक मुलगा हा गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील कन्हळगाव-वडेगाव येथील रहिवासी असून काल तो मित्रांसोबत धरणाच्या कालव्याकडे गेला होता. दरम्यान मित्रांसोबत आंघोळीला उतरला असताना पाण्याचा प्रवाहात आर्यन वाहून गेला होता 24 तासापासून आर्यन चा शोध कार्य सुरू असताना आज त्याचा मृतदेह घटनेच्या एक किलोमीटर अंतरावर गवसला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
- Akola Crime : दिव्या खालीच अंधार! चक्क रेल्वे अन् कृषी विद्यापीठाच्या जागेत गांजाची लागवड; अकोला पोलिसांची मोठी कारवाई
- Ajit Pawar in Baramati: अजितदादांचा बारामती दौरा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत, कट्टर विरोधकाच्या मेळाव्याला लावणार हजेरी?























