Gemini Horoscope Today 07th March 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांबद्दल बोलायचे झाल्यास, आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. घरात शुभ कार्याचा योग आहे. त्यामुळे सर्वांचं येणं-जाणं राहील. यामध्ये तुम्हाला तुमच्या बोलण्यातला गोडवा कायम ठेवावा लागेल. बदलत्या हवामानामुळे तुमच्या तब्येतीत चढ-उतार दिसतील. आरोग्याबाबत जागरुक राहा. नवीन लोकांशी संपर्क वाढेल. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल.
नोकरदारांसाठी आजचा दिवस कसा राहिल?
मिथुन राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाल्यास आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. नोकरदार लोकांबद्दल बोलायचे झाले तर आजचा दिवस तुमच्यासाठी खास नसेल. नोकरीतील काही महत्त्वाच्या निर्णयासंबंधित निर्णय घेताना तुम्ही गोंधळात पडाल. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळेल, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या जुन्या नोकरीला धरून राहणं योग्य ठरेल. आज तुम्हाला एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल, ज्याच्यासोबत तुमच्या जुन्या आठवणी ताज्या होतील.
बोलण्यातला गोडवा कायम ठेवा
तुम्ही मित्रासोबत सुख-दु:ख शेअर करू शकाल. कुठेतरी फिरायलाही जाण्याचा योग आहे. कुटुंबात शुभ कार्यक्रम आयोजित केले जातील. घरात मित्र-मैत्रीणींचं, नातेवाईकांचं सर्वांचं येणं-जाणं राहील. यामध्ये तुम्हाला तुमच्या बोलण्यातला गोडवा कायम ठेवावा लागेल. बदलत्या हवामानामुळे तुमच्या तब्येतीत चढ-उतार दिसतील. आरोग्याबाबत जागरुक राहा.
व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यासाठी नवीन योजना राबवतील. व्यवसायाशी संबंधित सहलीला देखील जाल, जे त्याच्यासाठी खूप फायदेशीर असेल. नवीन लोकांशी संपर्क वाढेल. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल.
आज मिथुन राशीचे आरोग्य :
सणासुदीमुळे काम जास्त राहील आणि थकवाही जास्त राहील. पाय दुखण्याच्या तक्रारी दिसून येतील. काही काळ कामाचं प्रमाण कमी करा. थोडा आराम करा.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हा हिरवा आहे. तसेच, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :