Shashikant Shinde On State Govt : शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे  (Shashikant Shind) यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसाच नसल्याची टीका शिंदे यांनी केली आहे. त्यामुळं राज्य सरकारची कर्जमाफी करावी, अशी मागणी केंद्र सरकारडे करणार असल्याचे ते म्हणाले. सध्या हुकूमशाहीचं राज्य आहे. लोकशाही मार्गाने कुणी आवाज उठवला की पोलिस लगेच त्याला बोलावतात असे शिंदे म्हणाले. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेवरुनही शशिकांत शिंदे यांनी सरकारवर टीका केली. ते गडचिरोलीमध्ये बोलत होते.

Continues below advertisement

लाडकी बहिण योजनेतून एक कोटी महिलांना वगळण्यात आलं

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते. त्यांनी विविध विषयांवर भाष्य करत राज्य सरकारवर निशाणा साधला. राज्य सरकार सध्या कर्जबाजारी झालं आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नाहीत. पहिली यादी आणि आता दुसरी यादी जाहीर झाली आहे. जसे पैसे येत आहेत, तशी यादी जाहीर केली जात असून आता राज्य सरकारची कर्जमाफी करा, अशी मागणी आम्ही केंद्र सरकारकडे करणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेवरुनही त्यांनी सरकारला घेरले. निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना सरसकट लाभ देण्यात आला. मात्र आता जवळपास एक कोटी महिलांना वगळण्यात आल्याचे शशिकांत शिंदे म्हणाले. आता त्यांच्याकडून वसुली केली जात आहे. 

सध्या हुकूमशाहीचं राज्य

सध्या हुकूमशाहीचं राज्य आहे. लोकशाही मार्गाने कुणी आवाज उठवला किंवा सोशल मीडियावर व्यक्त झाल्यास लगेच पोलीस ठाण्यातून बोलावणे येते. त्याला धमकी देऊन कारवाई केली जाते, हे प्रकार सर्रास घडत आहेत, असेही शशिकांत शिंदे म्हणाले. 

Continues below advertisement

आत्तापर्यंत राज्यातील 12 लाख शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफीचा लाभ : मंत्री बाबासाहेब पाटलांची माहिती

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती या योजनेच्या (Punyashlok Ahilyadevi Holkar Farm Loan Waiver Yojana) दुसऱ्या टप्प्यातील हप्ता जारी करण्यात आला आहे. 6,36,036 शेतकऱ्यांना 5086 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. दरम्यान, आत्तापर्यंत राज्यातील किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा (Farmers Loan waiver) लाभ मिळा आहे? याबाबतची माहिती तुम्हाला आहे का? तर राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आत्तापर्यंत राज्यातील 12 लाख शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळाल्याची माहिती बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे.