एक्स्प्लोर

Gadchiroli: माओवाद्यांच्या चकमकीत वीरमरण, गडचिरोली परिसर शहीद जवानाच्या पत्नीच्या आक्रोशाने हादरला

त्यांच्या पार्थिवावर चामोर्शी तालुक्यातील अन खोडा गावाच्या नदीकाठावर शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी 'शहीद महेश अमर रहे' या घोषणांसहित त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

Gadchiroli:आजवर प्रत्येक मोहिमेवरून सुखरूप परतले होते पण..सोमवारी माओवाद्यांच्या चकमकीत दोन पोलीस शहीद झाल्याची बातमी कानावर पडली आणि महेश नागुलवार यांच्या पत्नीचा ठोका चुकला. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील दिरंगी फुलनारच्या जंगलात माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत महेश नागुलवार हे ही कर्तव्यावर होते. रविवारी माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत 31 माओवादी ठार झाले. मात्र दोन पोलीस हुतात्मा झाल्याचं सांगण्यात आलं.गेल्या साडेचार वर्षात गडचिरोलीत पोलीस दलात प्रत्येक मोहिमेवरून सुखरूप परत आले परंतु यावेळी दारात पतीचा मृतदेह आला. मुलगी पप्पा कुठे आहेत म्हणून विचारणार आता तिला मी काय उत्तर देऊ? असा सवाल करत  शहीद पोलिसांच्या पत्नीचा आक्रोशाने परिसर हादरला होता. (Gadchiroli Naxal )

महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील दिरंगी फुलणार च्या जंगलात माओवाद्यांचे झालेल्या चकमकीत सी सिक्सटी पथकाचे महेश नागुलवार(Mahesh Nagulwar )शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर चामोर्शी तालुक्यातील अन खोडा गावाच्या नदीकाठावर शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी 'शहीद महेश अमर रहे' या घोषणांसहित त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

माओवाद्यांविरोधात मोहीमेत आले वीरमरण

गेल्या सव्वा महिन्यात छत्तीसगड बिजापूर भागात माओवाद्यांविरोधात मोहीम सुरू आहे. रविवारी छत्तीसगडच्या बिजापूर मध्ये सुरक्षा दलांच्या 650 जवानांनी इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसर पिंजून काढला. यावेळी सुरक्षा दलांचे जवान आणि माओवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत जिल्हा राखीव दल, विशेष कृती दल आणि राज्य पोलिसांचे बस्तर फाइटर सही सहभागी होते. या पथकांच्या चमूत महेश नागुलवार हे सी 60 पथकात होते. माओवादी आणि सुरक्षारक्षकांच्या चकमकीत छत्तीसगड मध्ये 31 जवान शहीद झाले. या चकमकीतच जिल्हा राखीव दलाचे दोन जवान हुतात्मा झाले तर दोन जण जखमी झाल्याची माहिती बस्तरक्षेत्रातून सांगण्यात आली. जखमींना घटनास्थळावरून हेलिकॉप्टर द्वारे रुग्णालयात नेण्यात आलं. चकमक स्थळी अतिरिक्त कुमक पाठवण्यात आली होती.

महेश नागुलवार यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही

नक्षलमुक्त भारताच्या अभियानात महेश नागुलवार यांनी राष्ट्रासाठी दिलेले बलिदान आम्ही कधीही विसरणार नाही, आणि त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही अशी भावपूर्ण श्रद्धांजली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीरगती प्राप्त झालेल्या सी-60 कमांडो महेश नागुलवार यांना अर्पण केली.भामरागड तालुक्यातील फुलनार जंगल परिसरात माओवाद्यांविरोधात मोठी कारवाई करत सी-60 जवानांनी नक्षलवादी तळ उद्ध्वस्त केला. मात्र, या कारवाईदरम्यान महेश नागुलवार यांना गोळी लागली आणि उपचारादरम्यान त्यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या शौर्याची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे दोन कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य आणि विविध लाभ देण्याची घोषणा केली.

हेही वाचा:

Mahesh Nagulwar : पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद जवान महेश नागुलवार यांना मानवंदना, नक्षल्यांसोबतच्या चकमकीत आले वीरमरण

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?

व्हिडीओ

Dombivli Pollution :  गुलाबी रस्ता आणि डोंबिवलीकर रागाने लाले लाल Special Report
Rural Area Students Studies : अभ्यासाचा भोंगा, मोबाईलला ठेंगा, सकाळ-संध्याकाळ फक्त अभ्यास Special Report
Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?
Mahapalikecha Mahasangram Jalgaon : जळगाव महापालिकेत कोण मारणार बाजी? जळगावकरांना काय वाटतं?
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
Share Market Holidays 2026 : पुढील वर्षी शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? NSE कडून सुट्ट्यांची यादी जाहीर
2026 मध्ये शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून सुट्ट्यांची यादी जाहीर
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
Lionel Messi India Tour: हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
Tamanna Bhatia: जयश्री गडकरांच्या रुपातील तमन्ना भाटियाचा फर्स्ट लूक, 'लख लख चंदेरी तेजाची' गाण्यावर डान्स, व्ही. शांतारामांच्या बायोपिकची उत्सुकता
जयश्री गडकरांच्या रुपातील तमन्ना भाटियाचा फर्स्ट लूक, 'लख लख चंदेरी तेजाची' गाण्यावर डान्स, व्ही. शांतारामांच्या बायोपिकची उत्सुकता
Embed widget