Gadchiroli Naxal: नक्षलवाद्यांना सरकारसोबत शांती वार्ता करायची आहे. त्यासाठी युद्धबंदी करण्याची आमची तयारी आहे, असे एक पत्रक केंद्रीय समिती सदस्य भूपती उर्फ सोनू उर्फ अभय म्हणजेच मल्लोजुला वेणुगोपालराव याने काही दिवसांपूर्वी जारी केले होते. मात्र, काल तेलंगणा राज्य समितीचा प्रवक्ता जगन ने काढलेल्या पत्रकात ती भूपतीची वैयक्तिक मागणी असून नक्षलवाद्यांची सामूहिक मागणी नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शांतीवार्ता आणि त्यासाठी युद्ध बंदीच्या मुद्द्यावरून नक्षलवाद्यांमध्ये उभी फूट पडल्याचे दिसून येत आहे. नक्षलवाद्यांच्या तेलंगणा राज्य समितीचा प्रवक्ता जगनने काल (शुक्रवारी) संध्याकाळी जारी केलेल्या पत्रकावरून सध्या तरी किमान तसंच दिसतंय.

Continues below advertisement

कोण आहे भूपती, नक्षलवाद्यांचं नवं जनरल सेक्रेटरी होऊ न शकल्यामुळे  वेगळी भूमिका?

- मल्लोजूला वेणुगोपालराव म्हणजेच भूपती उर्फ सोनू हा नक्षलवाद्यांच्या सर्वोच्च अशा केंद्रीय समितीच्या सदस्य आहे.

- 21 मे रोजी नक्षलवाद्यांचा जनरल सेक्रेटरी नंबाला केशवराव उर्फ बसव राजू मारला गेल्यानंतर भूपती नवं जनरल सेक्रेटरी होण्याच्या शर्यतीत होता.

Continues below advertisement

- मात्र काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या माहितीप्रमाणे नक्षलवाद्यांनी "तिप्पिरी तिरुपती उर्फ देवजी" याची जनरल सेक्रेटरी पदासाठी निवड केली होती.

-त्यानंतर अचानक भूपतीचा पत्रक समोर आला आणि त्यामध्ये त्यांनी नक्षलवाद्यांना सरकारसोबत शांतता वार्ता करायची असून त्यासाठी एक महिना युद्ध बंदी करण्याचा प्रस्ताव त्याने त्या पत्रकात ठेवला.

-गरज भासल्यास सरकारसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने चर्चा करण्याची तयारीही त्याने दर्शवली.

- आजवर सेंट्रल कमिटीचा वरिष्ठ सदस्य या भूमिकेतून भूपती याचे अनेक पत्रक समोर येत होते.

-त्यामुळे सरकार सोबत शांतता वार्ता आणि त्यासाठी एक महिन्यांची युद्धबंदी अशी भूपतीची ही भूमिका नक्षलवाद्यांची अधिकृत भूमिका आहे असे मानले गेले.

-मात्र आता नक्षलवाद्यांच्या तेलंगाना राज्य समितीने नव पत्रक काढून ती भूपतीची वैयक्तिक भूमिका असल्याचे सांगत भूपती नक्षल चळवळीमध्ये एकाकी पडल्याचा दाखवून दिलय.

भूपती खरंच एकाकी पडला आहे का?

-मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती हा वरिष्ठ नक्षल कमांडर किशनजीचा सख्खा भाऊ आहे.

-किशन जी 2012 मध्ये पश्चिम बंगालमधील एन्काऊंटरमध्ये मारला गेला आहे.

-भूपतीची पत्नी तारखा ने काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले आहे.

-काही दिवसांपूर्वी किशनची ची पत्नी सुजाता ने सुद्धा तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.

-त्यामुळे तेलंगणा मधील ब्राह्मण कुटुंबातील भूपती आता त्याच्या कुटुंबातून नक्षल चरवडीमध्ये एकटाच जंगलात राहिला आहे.

-त्यामुळे सरकारसोबत शांतता वार्ता आणि त्यासाठी एक महिन्याच्या युद्धबंदीचा त्याचा प्रस्ताव स्वतःच्या आत्मसर्पणाची तयारी आहे का असा प्रश्नही निर्माण होत आहे.

दरम्यान, अवघ्या काही दिवसांच्या अंतरावर सरकारसोबत शांतता वार्ता आणि युद्धबंदी यासंदर्भात नक्षलवाद्यांचे परस्पर विरोधाभासी पत्रक नक्षलवाद्यांमध्ये युद्धबंदी च्या मुद्द्यावर उभी फूट पडल्या चे संकेत देणारे आहे.

इतर महत्वाच्या बातम्या