Gadchiroli News : जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील अबुजमाड परिसर म्हणजे नक्षलवाद्यांचे (Naxal) माहेरघर. याच परिसरात नक्षलवाद्यांच्या बैठका, अधिवेशन भरविले जायचे. हा परिसर नक्षलवाद्यांसाठी अतिसुरक्षित. मात्र आता याच परिसरातील छत्तीसगड सीमेपासून केवळ 100 मीटर अंतरावर असलेल्या कवंडे गावात रविवारी गडचिरोली (Gadchiroli News)  पोलिसांनी 24 तासात पोलीस मदत केंद्राची उभारणी केली आहे. त्यामुळे छत्तीसगडमधून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या नक्षलवाद्यांसाठी खडा पहारा राहणार आहे. नक्षलवाद्यांसाठी गडचिरोली जिल्ह्यात येण्यासाठी प्रवेशद्वार असलेल्या याच भागात पोलीस मदत केंद्र स्थापन झाल्याने नक्षलवाद्यांची एक प्रकारे कोंडी झाली आहे. येथील पोलीस मदत केंद्र नक्षलवाद (Gadchiroli Naxal) संपवण्यासाठी महत्वाचे ठरेल.  असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी व्यक्त केला. 

दिलासादायक! आणखी दोन गावांचा नक्षलवाद्यांना गावबंदी करण्याचा ठराव  

दुसरीकडे, नक्षलवाद्यांच्या प्रभावक्षेत्रातील 20 गावांनी काही महिन्यांपूर्वी नक्षलवाद्यांना गावबंदी करण्याचा ठराव केल्यानंतर भामरागड तालुक्यातील पोयारकोठी आणि मरकणार या आणखी दोन गावांनी नक्षलवाद्यांना गावबंदी केली आहे. यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्याकडील 2 भरमार बंदुका पोलिसांकडे सुपूर्द करत नक्षलवाद्यांना यापुढे कोणतेही सहकार्य करणार नाही, अशी भूमिका मांडली. 2003 पासून शासनामार्फत नक्षल गावबंदी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून विविध शासकिय योजनांचा लाभ पोलीस दलाकडून नागरिकांना मिळवून दिला जात आहे. यामुळेच गेल्या काही महिन्यात गडचिरोली जिल्ह्याच्या (Gadchiroli News) अतिदुर्गम भागातील पेनगुंडासह एकूण 20 गावांनी नक्षलवाद्यांना गावबंदीचा ठराव एकमताने संमत केला होता. 

अकोल्यात दोन कारमध्ये भिषण अपघात

अकोला शहरातील अशोका वाटिका चौकात मध्यरात्रीनंतर (9 मार्च) घडलाय. शहरातील नवीन आळशी प्लॉट भागातून जिल्हाधिकारी कार्यालय चौकाकडे भरधाव येत असलेल्या कारने एका कारला जोरदार धडक दिलीय. त्यानंतर अनियंत्रित कार थेट चौकातील सिग्नलच्या खांबाला धडक देत डिव्हायडरवर चढलीय. यात दोन्ही कारमधील तीनजण गंभीर जखमी झालेय. त्यांच्यावर अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरूयेत. भरधाव वेगाने आलेली कार ही नवीन आळशी भागातील वोरा नामक व्यक्तीची असल्याची प्राथमिक माहिती मिळतीये. गाडीचा वेग अनियंत्रित का झालाय?. गाडी चालकाने मद्यसेवन केले होतेय काय?, याचा शोध पोलीस घेतायेत. या अपघातात दोन्ही कारचं मोठं नुकसान झालंय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

हे ही वाचा