Gadchiroli Naxalites News : गडचिरोलीतील नक्षलवाद संदर्भात एक अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. गडचिरोली पोलीस (Gadchiroli Police) आणि महाराष्ट्राच्या गृह विभागाच्या माओवाद विरोधातील (Gadchiroli Naxalites News) लढाईला आजवरचं सर्वात मोठं यश प्राप्त झालं आहे. माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर तसेच सेंट्रल कमिटी मेंबर मल्लोजूला वेणुगोपाल राव (Venugopal Rao) उर्फ सोनू उर्फ भूपती याने त्याच्या 50 सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर (Gadchiroli Police) आत्मसमर्पण (Naxal Leader Bhupati Surrender) केल्याची माहिती समोर आली आहे. काल (14 ऑक्टोबर) रात्री दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील घनदाट जंगलात छत्तीसगड सीमेलगत महाराष्ट्राच्या बाजूने हे सामूहिक आत्मसमर्पण झाले आहे. परिणामी गडचिरोलीच्या (Gadchiroli) इतिहासातील हि आजवरची सर्वांत मोठी शरणागती असल्याचे बोललं जात आहे.
Naxal Leader Surrender: 6 कोटींचे बक्षीस असलेल्या मल्लोजुला रावसह 50हून अधिक नक्षलवादी शरण
मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल सहा कोटींचे बक्षीस असलेल्या मल्लोजुला रावसह 50हून अधिक नक्षलवादी आज शरणागती पत्करणार आहे. यामुळे नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐनवेळी सोलापूरचा विमानप्रवास टाळून मोर्चा गडचिरोलीकडे वळवला आहे. ते आज देवेंद्र गडचिरोलीत या कार्यक्रमाला स्वत: उपस्थित राहणार आहे. शिवाय मुख्यमंत्री उपस्थित राहणार असतील तर शरणागती पत्करु, अशी अटच वेणुगोपाल राव (Venugopal Rao) उर्फ सोनू उर्फ भूपती याने टाकली होती. त्यामुळे ऐनवेळी सोलापूरचा विमानप्रवास टाळून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मोर्चा गडचिरोलीकडे वळवला आहे. तर गडचिरोलीतील कार्यक्रम आटोपून मगच देवेंद्र फडणवीस सोलापूरला जाणार आहेत.
Gadchiroli Naxal: लवकरच महाराष्ट्रातून सशस्त्र माओवाद पूर्णपणे हद्दपार
अशातच, काही दिवसांपूर्वी गडचिरोली डिव्हिजन ने एकत्रितरीत्या पत्रक काढत सोनू उर्फ भूपतीच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता. त्यानंतर उत्तर बस्तर आणि माड डिव्हिजन मधील काही नक्षल कमांडर स्नेही तशाच पद्धतीचे पत्रक काढले होते. त्या,.मुळे सोनू उर्फ भूपती लवकरच शरणागती पत्करेल, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र तो प्रामुख्याने छत्तीसगड किंवा तेलंगणामध्ये शरणागती पत्करेल, अशी स्थिती असताना महाराष्ट्र पोलिसांनी बाजी मारली आणि सोनू उर्फ भूपतीचा शस्त्र खाली ठेवून शरणागती पत्करण्या संदर्भात मन वळवण्यात यश मिळवलंय.
ही बातमीही वाचा: