Chhattisgarh Naxal :जेव्हा तुम्ही-आम्ही आपापल्या घरी गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी करत होतो, तेव्हा गडचिरोली पोलिसांचे शेकडो जवान रक्तबंबाळ पायांनी नक्षलवाद्यांचा सामना करत होते. मात्र, C - 60 पथकाच्या जवानांना रक्तबंबाळ करणारे नक्षलवादी किंवा त्यांच्या गोळ्या नाहीत, तर जबर पाऊस आणि जंगलातील विपरीत परिस्थितीने गडचिरोली पोलीसातील सुमारे 50 जवानांना वेगळ्या पद्धतीने गंभीर जखमी केले आहे. त्यामुळे चकमकीच्या अनेक दिवसानंतर ही हे जवान चालण्याच्या स्थितीत नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, 27 ऑगस्ट म्हणजेच गणेश चतुर्थीच्या पहाटे भामरागड तालुक्यातील महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर कोपर्शी - फुलनारच्या जंगलात गडचिरोली पोलिसांच्या सी सिक्सटी पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली. यात चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले. मात्र घनदाट जंगलात अत्यंत दुर्गम ठिकाणी असलेल्या नक्षलवाद्यांना घेरण्यासाठी 25 ऑगस्टपासून हे जवान जंगलात पायपीट करत होते. भर पावसात नदी नाले ओलांडत होते. सलग चार दिवस हे जवान चिखलात आणि ओलसर जमिनीत चालत असल्यामुळे आणि सतत चार दिवस पायात शूज (बूट) घालून असल्यामुळे या जवानांच्या पायात गंभीर जखमा (ब्लिस्टर्स) झाल्या असून पाय रक्तबंबाळ झाले आहे, अनेकांच्या पायात गंभीर सूज निर्माण झाली आहे. त्यामुळे मोहीम फत्ते करून परत आल्यानंतरही हे जवान जमिनीवर साधे चालण्याच्या ही स्थितीत नाही.

कोपर्शी फुलनारच्या जंगलात नेमकं काय घडलं?

संपूर्ण महाराष्ट्र उत्साहातगणेशोत्सव साजरा करत असताना गडचिरोली जिल्ह्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर कोपरशी परिसरात गडचिरोली पोलिसांचे सी-60 चे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये  (Chhattisgarh Naxal) जोरदार चकमक झाली होती. 27 ऑगस्टच्या पहाटेपासून ही चकमक (Naxal) सुरू होती. तर परिसरात जोरदार पाऊसही सुरू होता. त्यामुळे सी-60 च्या जवानांसमोरील आव्हान वाढले. मात्र विपरीत परिस्थितीतही गडचिरोली पोलीस नक्षलवाद्यांच्या प्रत्येक हल्ल्याला सडेतोड उत्तर देत राहिले. नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सी-60 पथकाकडून हे अभियान राबवण्यात आले होते.मात्र घनदाट जंगलात अत्यंत दुर्गम ठिकाणी असलेल्या नक्षलवाद्यांना घेरण्यासाठी 25 ऑगस्टपासून हे जवान जंगलात पायपीट करत होते. भर पावसात नदी नाले ओलांडत होते. सलग चार दिवस हे जवान चिखलात आणि ओलसर जमिनीत चालत असल्यामुळे आणि सतत चार दिवस पायात शूज (बूट) घालून असल्यामुळे या जवानांच्या पायात गंभीर जखमा (ब्लिस्टर्स) झाल्या असून पाय रक्तबंबाळ झाले आहे.

ही बातमी वाचा: