बीड : खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या (Satish Bhosale) शिरूर कासार गावात असलेल्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आला होता. वन विभागाच्या जागेवर हे अनधिकृतपणे घर बांधण्यात आलं होतं. त्यामुळे वनविभागाने ही कारवाई केली होती. या आधी वनविभाने नोटिस पाठवली होती. पण 48 तासांमध्ये कोणतंही उत्तर न आल्यामुळे परिणामी ही कारवाई करण्यात आल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आलंय.
अशातच, भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या खोख्या उर्फ सतीश भोसलेच्या या घरावरील कारवाई प्रकरणी वनमंत्री गणेश नाईकांनी (Ganesh Naik) मोठं विधान करत कारवाई संदर्भात सुतोवाच केलं आहे. वन अधिकाऱ्यांनी खोक्या भोसलेच्या कुटुंबीयांच घर वनक्षेत्राच्या बाहेर असताना पाडला असेल, तर त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल. मात्र वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून ते राहत असेल, तर वन विभागाची कारवाई योग्यच म्हणावी लागेल. किंबहुना वनक्षेत्राच्या बाहेर जाऊन वनाधिकाऱ्यांनी घर पाडले असतील तर चौकशी अंती वनाधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई केली जाईल. असेही वनमंत्री गणेश नाईकांनी यावेळी सांगितलंय.
वनक्षेत्र 21% टक्के वरून 30% व्हावं, यासाठी प्रयत्न- गणेश नाईक
दरम्यान, 65 टक्के वन विदर्भात असून आणि वनविभागाचे बहुतांशी कार्यालय ही विदर्भातील नागपुरात आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन सूचना देण्यासाठी आज आणि उद्या वनविभागाच्या महत्त्वाच्या बैठकांचे आयोजन नागपूर करण्यात आले आहे. प्रामुख्याने वाघ आणि मानवी संघर्ष संदर्भात तसेच वाघांच्या मृत्यू बद्दल या बैठकीत चर्चा करणार आहोत. वन विभागाचा उत्पन्न वाढावे यासाठी वन विकास महामंडळ, मंग्रोव्ह डिव्हिसन आणि सामाजिक वनीकरनच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्राचे वनक्षेत्र 21% टक्के वरून 30% व्हावं यासाठी प्रयत्न सुरू आहे. असेही वनमंत्री गणेश नाईकांनी यावेळी सांगितलंय.
आम्ही महायुतीत आहोत. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि तो कोणीही रोखलेला नाही. कुठल्याही पक्षाच्या नेत्यांना आमदारांना कुठल्याही क्षेत्रात जाऊन आपल्या पक्षाचा प्रचार केला आणि त्याद्वारे महायुती मजबूत करण्याचा प्रयत्न केला, तर त्यात काहीही वावगं नाही. असे म्हणत मंत्री गणेश नाईकांनी ठाणे जनता दरबारावर भाष्य केलंय. 1995 मध्ये युती झाली होती. तेव्हापासूनच मंत्री आणि राज्यमंत्री यांच्यातील कामाचे वाटप केले होते. त्यानुसारच राज्यमंत्री अधिकार दिले जातील, असा विश्वास आहे. असेही ते म्हणाले.
प्रकल्प अडवण्याचा कारण नाही, कोणी अडवणार ही नाही
मुनावडे सातारा जिल्ह्यात या जल प्रकल्पाचे काम कोणीही थांबवलेलं नाही. कोणताही प्रकल्प सुरू करताना पर्यावरण विभाग आणि वनविभागाची औपचारिक परवानगी आवश्यक असते. त्या अनुषंगाने दोन्ही खात्यात कागदपत्रांचा आदान प्रदान होईल. कोणताही प्रकल्प अडवण्याचा कारण नाही, कोणीही अडवणार नाही. महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी राज्यात कुठल्याही भागात जनतेसाठी प्रकल्प करण्याचा ठरवलं, तर महायुतीचे सर्व नेते त्या प्रकल्पाला पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतील. असे ही वनमंत्री गणेश नाईक यावेळी म्हणाले.
हे ही वाचा