दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी याआधी कर्जमाफीसाठी अर्ज केला आहे त्यांनी पुन्हा ऑनलाईन अर्ज करु नये असं आवाहन शासनाकडून करण्यात आलं आहे. वंचित शेतकऱ्यांचे अर्ज आपले सरकार केंद्रावर किंवा शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉगीन करुन जमा करता येणार आहेत.
http://csmssy.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे अर्ज भरता येणार आहेत. कर्जमाफीच्या अर्जासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. अर्ज भरताना शेतकऱ्यांना आधार नंबरच्या साहाय्याने बायोमेट्रिक पद्धतीने किंवा वन टाईम पासवर्डच्या माध्यमातून आपलं प्रमाणीकरण करावं लागणार आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक, तालुका सहाय्यक निबंधक, जिल्हा बँक किंवा सबंधित राष्ट्रीयकृत बँक यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन शासनाकडून करण्यात आलं आहे.
अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी https://csmfs.mahaonline.gov.in/PDF/CSMFS_User_Manual.pdf या लिंकला भेट द्या.