पंढरपूर/ सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला आहे. हेलिकॉप्टर बिघडल्यानं प्रशासनाची तारांबळ उडाली होती. हेलिकॉप्टरच्या बॅटरीचा अचानक प्रॉब्लेम झाल्यानं एकनाथ शिंदे बराच वेळ हेलिपॅडवर थांबले होते. एकनाथ शिंदे यांचा आज पंढरपूर दौरा होता, त्यानंतर ते हेलिपॅडवर आले होते. मात्र, हेलिकॉप्टरच्या बॅटरीचा प्रॉब्लेम झाल्यानं ते सुरु होऊ शकलं नाही. यामुळं एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक अधिकारी देखील हेलिपॅड परिसरात उपस्थित होते. 

Continues below advertisement

एकनाथ शिंदे ज्या हेलिकॉप्टरनं प्रवास करणार होते ते सुरु न झाल्यानं त्यांना किमान 20 मिनिटं हेलिपॅडवर थांबले होते. संबंधित हेलिकॉप्टर एअर इंडियाचं असल्याची शक्यता आहे. हेलिकॉप्टरची बॅटरी बदलण्यासाठी पाठवण्यात आल्याची माहिती आहे. दुसरी बॅटरी आल्यानंतर हेलिकॉप्टर सुरु होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जातंय. अखेर एकनाथ शिंदे रस्ते मार्गे सोलापूरला रवाना झाले.   

एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर बंद पडल्यानं त्यांनी रस्त्यानं प्रवास करत सोलापूरला जाण्याचा निर्णय घेतला आहे. हेलिकॉप्टर तांत्रिक दुरुस्ती  न झाल्यानं एकनाथ शिंदे यांना रस्ते मार्गानं  पुण्याकडे जावं लागलं आहे. पुण्यातून एकनाथ शिंदे पुढील प्रवास विमानानं करतील अशी शक्यता आहे. 

Continues below advertisement

कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं पाहणी करण्यासाठी एकनाथ शिंदे पंढरपूरमध्ये दाखल झाले होते. विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदी परिसरात आढावा घेतल्यानंतर एकनाथ शिंदे मुंबईला जाण्यासाठी हेलिपॅडवर पोहोचले होते. 

स्थानिकांनी दिलेल्यामाहितीनुसार एकनाथ शिंदे कार्तिकी वारीचं नियोजन पाहण्यासाठी पंढरपूरला आले होते. एकनाथ शिंदे मुंबईसाठी रवाना होत असताना हेलिकॉप्टरमध्ये काही बिघाड झाला. हेलिकॉप्टरचं दुसरं इंजिन चालू होतं नव्हतं. पोलिसांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी कोणताही धोका न पत्कारता रस्ते मार्गानं प्रवास करावा असा आग्रह एकनाथ शिंदे यांना केला. त्यानुसार एकनाथ शिंदे यांनी रस्ते मार्गानं जाण्याचा निर्णय घेतला.  हेलिकॉप्टरचं एक इंजिन सुरु होत होतं, मात्र दुसरं इंजिन सुरु होत नव्हतं, त्यामुळं एकनाथ शिंदेंनी रस्ते मार्गे जाण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं. 

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अभिजीत पाटील यांनी देखील यासंदर्भात माहिती दिली. शिंदे साहेबांनी कार्तिकी वारीचा आढावा बैठक घेतली. साहेब हेलिकॉप्टरमध्ये बसले होते, आम्ही तिथून बाजूला गेलो होतो. मात्र, परंतु हेलिकॉप्टर सुरु होत नव्हतं, आम्ही पुन्हा तिथे गेल्यानंतर पायलटनं एक इंजिन सुरु झालं मात्र दुसरं इंजिन स्टार्ट होण्यासाठी बॅटरी लो झाल्यानं अडचण झाली होती. तांत्रिक अडचणींमुळं जिल्हाधिकारी  आणि पोलीस अधीक्षकांच्या विनंतीनंतर पुण्यातून विमानातून पुढील प्रवास करावा, अशी विनंती केली होती. त्यानुसार एकनाथ शिंदेपुणे विमानतळाच्या दिशेने गेले, अशी माहिती अभिजीत पाटील यांनी दिली.