सातारा : मी दरे गावात आलो की अनेकांची पोटदुखी सुरू होते. अशासाठी बाळासाहेब ठाकरे मोफत दवाखाना (Hinduhridaysamrat Balasaheb Thackeray Aapla Dawakhana) सुरू केला. अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधकांवर केली आहे. मुद्दा नसल्यामुळे विरोधक कोणत्याही गोष्टीचे राजकारण करत आहेत. असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) काळी दिवाळी आंदोलनावर भाष्य करत टीका केली आहे. मी दरे गावी आलो की विरोधकांचं पोट दुखू लागतं. दिल्लीला गेले की पोटात दुखत. मी त्याचा विचार करत नाही. या सर्व पोटदुखीवाल्यांचा बंदोबस्त केला आहे. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मोफत आहे. असेही ते म्हणाले.

Continues below advertisement

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज दारे गावात जात सफरचंदाच्या बागेत जाऊन सफरचंदाच्या झाडांची पाहणी केली. यावेळी स्वतः रोटर हातात घेऊन मशागत केली. यावेळी शेतात काम करत असताना त्यांच्यावर शेतीवर टीका करणाऱ्या विरोधकांचा चांगला समाचार घेतला. विरोधकांच्याकडे आता मुद्दे नाहीत. पूर परिस्थितीबाबत त्यांना वाटले नव्हते बत्तीस हजाराचा पॅकेज हे सरकार शेतकऱ्यांना देईल. मी म्हणालो होतो दसऱ्याच्या मेळाव्यात शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. त्याप्रमाणे आम्ही पैसे देणे सुरू केले आहे. त्यामुळे काय बोलणार, काय मुद्दा नाही. कुठल्याही गोष्टीचा राजकारण करायचं त्यांनी ठरवलं आहे. शेती असो किंवा निवडणूक असो, विरोधक दिशाभूल करायचं काम करतात. चांगला निर्णय घेतला तर चांगलं म्हणायला पाहिजे. हेच लोक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बुके देत होते आणि आता टीका करतात. ही दुटप्पी भूमिका आहे. हे कायम रडगाणं आहे. बाळासाहेबांनी आम्हाला कधीही रडायला शिकवलं नाही. लढायला शिकवला आहे. असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Continues below advertisement

सातारा जिल्ह्यातील कराडजवळ बंगलोर हायवेवर (Bangalore Highway) दिवाळीच्या (Diwali) सुट्ट्यांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. सणाला गावी जाणाऱ्या चाकरमान्यांमुळे आणि वाढलेल्या वाहनांमुळे कराडजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सकाळी सकाळी झालेल्या या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी आणि वाहनचालक चांगलेच वैतागले असून, सणाच्या दिवशी घरी वेळेवर पोहोचण्याच्या चिंतेत आहेत. दिवाळीच्या सुट्ट्या लागल्याने अनेकजण आपल्या मूळ गावी परतत असल्यामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीचा वेग मंदावला आहे. या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

आणखी वाचा