Doppler Radar in Parbhani :  मराठवाड्यातील (Marathwada) वाढत्या लहरी हवामानाच्या पूर्वसूचनेसाठी आणि दलत्या हवामानाचा अचूक अंदाज येण्याकरिता केंद्र सरकारकडून परभणीत सी बँड डॉप्लर रडार (Doppler Radar)  बसवण्यात येणार आहे. परभणीसाठी (Parbhani) सी बँड डॉप्लर रडार (Doppler Radar) बसवण्यास केंद्राची मंजुरी मिळाली असून यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सी बँड डॉप्लर रडार बसवण्याच्या कामास आधीच सुरुवात झाली आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दलत्या हवामानाचा अचूक अंदाज येण्याकरिता यासाठी ठोस अशी यंत्रणा बसवण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. हवामानाचा अचूक अंदाज आल्यास शेतीचे संभाव्य नुकसान टाळता येईल, असा यामागील उद्देश आहे. यासाठी आता केंद्र सरकारच्या वतीने परभणीसाठी सी बँड डॉप्लर रडार बसवण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Continues below advertisement

सोलापुरात देखील सी बँड रडार कार्यान्वित करण्यात आले असून ज्यामाध्यमातून परभणी आणि नांदेड परिसरातील हवामानच्या पूर्वसूचनेची माहिती मिळत आहे. मात्र, मराठवाड्यातील वाढता पाऊस, कमी वेळेत होणारा अधिक पाऊस, पिक पाणी संरक्षण आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजना मिळाव्या या उद्देशाने केंद्र सरकारने पुढाकार घेत या प्रस्तावित कामाला मंजुरी दिली आहे. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडून जुलै महिन्यात सी बँड रडार परभणीत बसवण्याची मागणी केली होती. अशात, मागील काही दिवसात झालेली मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे केंद्राकडून लगेच रडार बसवण्यास मंजुरी मिळाल्याची माहिती आहे.

C-Band Doppler Weather Radar : सी बँड रडार काय काम करतं?

Continues below advertisement

- सी-बॅंड रडारची क्षमता जवळपास 300 किमीपर्यंत बघण्याची असते. सोबतच हे रडार संपूर्णपणे स्वदेशी बनावटी आहे. याचं डिझाईन इस्त्रोने तयार केलंय.

- तीन तासाचे जे अलर्ट मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून दिले जातात हे अधिक अचूक होण्यास मदत करतील.

- परभणी, नांदेड, लातूर भागातील शेतकऱ्यांना ह्या सी-बॅंड रडारमुळे मदत होणार

- प्रामुख्याने मुसळधार पाऊस, गारपीट, वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासंबंधी माहिती मिळेल

- ह्याच सोबतच वेदर सिस्टिम समजून घेण्यासाठी, पुराचा धोका आहे की नाही, सोबतच हवामानातील बदलांसंदर्भातल्या संशोधनांसाठी हे उपयोगी ठरेल

- ढगांमध्ये होत असलेले सूक्ष्म भौतिक बदल देखील ह्या रडारच्या माध्यमातून कळतील

हे हि वाचा