मुंबई : भारतात अनेक ठिकाणी आपला राग व्यक्त करण्यासाठी नेते मंडळी अथवा पुढाऱ्यांवर सर्वसामान्य अथवा कार्यकर्ते हे चप्पल, बुट फेकून मारण्याचे प्रकार सर्रास पहायला मिळतात. मात्र, हल्ली न्यायव्यवस्थाही याला अपवाद नाही. गुरुवारी मुंबईतील दिंडोशी दंडाधिकारी न्यायालयात चक्क वकीलांचा काळा कोट घालून आलेल्या व्यक्तीनं थेट न्यायाधिशांवरच लोखंडी सळी भिरकावण्याचा प्रकार केला. या घडलेल्या प्रकारामुळे गोंधळ उडाला असून याची गंभीर दखल घेत दिंडोशी कोर्टात येणाऱ्या वकिलांची त्यांच्या सामानासकट कसून तपासणी करण्याचे निर्देश मुख्य न्यायाधीशांनी दिले आहेत.
मुंबई उपनगरातील दिंडोशी सत्र न्यायालयातील एस. यु. बघेले यांच्या कोर्ट क्रमांक 10 मध्ये गुरूवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एका खटल्यावर सुनावणी सुरू होती. त्यावेळी वकिलाच्या वेशातील एका व्यक्तीने दंडाधिकारी न्यायाधीश बघेल यांच्यावर एक लोखंडी सळी भिरकावून हल्ला केला. या हल्ल्यात दंडाधिकारी थोडक्यात बचावले असले तरी अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सगळीकडे एकच गोधंळ उडाली. तेव्हा, सळी भिरकावणाऱ्य़ा या आरोपीला पोलिसांनी लगेचच पकडून अटक केली.
ओमकारनाथ पांडेला (60) असं या व्यक्तीचं नावं आहे. पांडे हा साकीनाका परिसरात राहत असून तो एका हत्येच्या खटल्यात साक्षीदार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच कृष्णजन्मानिमित्त ही लोखंडी बासरी आपण न्यायाधीशांना दिल्याचा त्याचा दावा आहे. या घटनेनंतर दिंडोशी सत्र न्यायालयातील सुरक्षितेत वाढ करण्यात आली असून यापुढे दिंडोशी न्यायालयात येणाऱ्या वकिलांचीही त्यांच्या सामानासह कसून तपासणी करण्याचे आदेश सत्र न्यायालयाचे अतिरिक्त प्रमुख न्यायाधीश एस. एम. शर्मा यांनी तातडीनं जारी केलेल्या निर्देशात म्हटले आहे. तसेच सर्व वकिलांनाही त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन पत्रकातून करण्यात आले आहे.
दिंडोशी न्यायालयात न्यायाधीशांवर भिरकावली लोखंडी सळी, आरोपी ताब्यात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Jan 2020 10:02 PM (IST)
या हल्ल्यात दंडाधिकारी थोडक्यात बचावले असले तरी अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सगळीकडे एकच गोधंळ उडाली. तेव्हा, सळी भिरकावणा-या या आरोपीला पोलिसांनी लगेचच पकडून अटक केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -