Dhule : विश्वास पाटलांचा 1 कोटी 36 लाख रुपये पगार थकीत, कोर्टाकडून धुळ्यातील शिक्षणाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त
Dhule Education Officer : धुळ्यातील माजी मुख्याध्यापकाचा दहा वर्षांचे एक कोटी 36 लाख रुपयांचे वेतन थकीत करण्यात आले होते. त्यामुळे न्यायालयाने शिक्षणाधिकाऱ्यांची खुर्ची जप्तीचे आदेश दिले.

धुळे : न्यायालयाने आदेश देऊनही अनेकदा आपले शासकीय कार्यालये किंवा अधिकारी त्यावर कोणतीही कार्यवाही करत नाहीत. त्यामुळे न्यायालयाला अखेर त्यांच्या अधिकाराचा वापर करत वेगवेगळे आदेश द्यावे लागतात. असाच एक आदेश धुळ्यातील न्यायालयाने (Dhule Court) दिला आणि शिक्षणाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्यात आली. एका शाळेतील माजी मुख्याध्यापकांचे दहा वर्षांचे 1 कोटी 36 लाख रुपयांचे वेतन थकीत असल्याने न्यायालयाने हा आदेश दिला.
Dhule Court On Education Officer Chair : नेमकं प्रकरण काय?
गुरुदत्त विद्या प्रसारक संचालित आदर्श माध्यमिक विद्यालयात तत्कालीन मुख्याध्यापक विश्वास पाटील यांना संस्थेच्या संचालक मंडळाने बेकायदेशीरपणे निलंबन केलं. दहा वर्षे मुख्याध्यापक असतानाही त्यांचा थकीत पगार दिला नव्हता. त्यामुळे विश्वास पाटील यांनी नाशिकमधील शाळा प्राधिकरण न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांची याचिका शाळा प्राधिकरण न्यायालयाने मंजूर करून त्यावर सुनावणी घेतली.
Dhule Court Order : मुख्याध्यापकांच्या बाजूने निर्णय
या प्रकरणी धुळे न्यायालयाने तत्कालीन मुख्याध्यापक विश्वास पाटील यांच्या बाजूने निकाल दिला. संबंधित गुरुदत्त विद्याप्रसारक संस्थेकडून विश्वास पाटील यांचे थकीत 1 कोटी 36 लाख रुपये वेतन वसूल करून द्यावे असा आदेश न्यायालयाने शिक्षण विभागाला दिला.
धुळे न्यायालयाने दिलेल्या आदेशांची पायमल्ली करत जिल्हा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. अखेर न्यायालयाने शिक्षणाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्याचे आदेश दिले.
Dhule Education Officer Chair : शिक्षणाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त
विश्वास पाटील यांना तशी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या वकिलांना सोबत घेऊन कायदेशीररित्या शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी यांची खुर्ची जप्तीसाठी धाव घेतली. मात्र शिक्षण अधिकारी कामानिमित्ताने बाहेरगावी होते. त्यांचा अतिरिक्त कार्यभार हा उपशिक्षणाधिकारी ठाकूर मॅडम यांच्याकडे होता. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने उपशिक्षणाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करत पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.
ही बातमी वाचा:


















