Tuljapur Drugs Case : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील 'आका'ला मोकाट सोडलं, पोलिसांकडून आरोपींना अभय; ओमराजे अन् कैलास पाटलांचा सनसनाटी आरोप
Tuljapur Drugs Case : तुळजापूरमधील बहुचर्चित ड्रग्ज तस्करी प्रकरणाच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

Tuljapur Drugs Case : तुळजापूरमधील बहुचर्चित ड्रग्ज तस्करी प्रकरणाच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. शिवसेना गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी ड्रग्ज प्रकरणातील "आका"ला मोकाट सोडण्यात आलं आहे. या प्रकरणात पोलीस सहभागी असल्याचा उल्लेख जबाबात असूनही कारवाई झालेली नाही, असा गंभीर आरोप केला आहे.
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसाच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलिसांनी आरोपींना वाचवण्यासाठी अनेक त्रुटी केल्या असून मुंबई व सोलापूर येथील मुख्य आरोपींची नावे समोर येऊनही त्यांना अभय देण्यात आले आहे. शिवाय ड्रग्ज प्रकरणात आरोपींच्या जबाबात नाव आलेल्या पोलिसांवरही कारवाई झाली नाही. पोलीस आरोपींना जामीन मिळावा यासाठी प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांना सर्व कागदपत्रे दाखवणार
आरोपींवर मकोको अंतर्गत कारवाई करावी यासाठी मुख्यमंत्री यांना भेटणार असल्याची माहिती खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी दिलीय. तपासात चुका असून आरोपींना अभय दिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना सर्व कागदपत्रे दाखवणार आहे. तुळजापूरात ड्रग्ज तस्करी होत असल्याची माहिती डिसेंबर 2023 मध्येच माहिती होती तर प्रत्यक्षात प्रथम गुन्हा दाखल होण्यास 1 वर्ष 1 महिन्याचा कालावधी का लागला? असा प्रश्न उपस्थित करत 1 वर्षाच्या कालावधीत केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून किंवा राजकीय स्वार्थापोटी आ. राणा पाटील यांनी पोलिसांना काही सांगितले नसल्याचा आरोप देखील खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलाय.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात 10 हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल
दरम्यान, तुळजापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज तस्करीची मोठी चर्चा आहे.15 फेब्रुवारी 2025 ला तुळजापूर तालुक्यात 2.5 लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात अनेक उलगडे होत आहेत. लाखो भाविकांच्या तुळजापुरात ड्रग्ज तस्करीमध्ये पुजारीच पेडलर असल्याचं समोर आलं होतं. दरम्यान, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. तब्बल 10 हजार पानांचे दोषआरोपपत्र धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात 35 आरोपी असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात राजकीय कनेक्शन समोर आल्यानंतरआतापर्यंत 14 आरोपींना अटक करण्यात आली असून 21 आरोपी फरार आहेत.
आणखी वाचा
























