Omraje Nimbalkar VS Ranajagjitsinha Patil :गणेश विसर्जनाच्या (Ganesh Visarjan 2025) मिरवणुकीदरम्यानधाराशिवमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसून आले. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजेनिंबाळकर(OmrajeNimbalkar) आणि भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) यांचे पुत्र मल्हार पाटील (Malhar Patil) यांच्यातमिरवणुकीदरम्यान थेट आमना-सामना झाला. यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वीच (Elections) राजकीय रंगत वाढली आहे.

विसर्जन मिरवणुकीतून 'सामना'; समर्थकांचा गराडा 

गणेश विसर्जन मिरवणूक नित्यनियमाने उत्साहात पार पडत असली तरी यावेळी राजकीय वर्चस्वाची झलकही पाहायला मिळाली. भाजपचे युवा नेते मल्हार पाटील हे आपल्या समर्थकांसह मिरवणुकीत सहभागी झाले असताना, दुसरीकडे खासदार ओमराजेनिंबाळकर हेही मिरवणुकीत सहभागी झाले होते. याच दरम्यान दोघांचे मार्ग एकत्र आले आणि मल्हार पाटील यांना त्यांच्या समर्थकांनी गराड्यात घेत, ओमराजेनिंबाळकर यांना थेट दंड थोपटून आव्हान दिले.

“नादी नको लागू माझ्या...” गाण्यावर रीलव्हायरल, ओमराजेंचा प्रतिसाद

घटनेच्या पार्श्वभूमीवर काही तरुणांनी "नादी नको लागू माझ्या, तुला चांगलाच रडविन... ढोलकीला बांधून तुला बदाबदा बडविन..." या गाण्यावर मल्हार पाटील यांचे रील्ससोशलमीडियावर पोस्ट केल्याने ती क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे. हे गाणं ऐकत असतानाच खासदार ओमराजेनिंबाळकर हे एकीकडे स्मित हास्य करत भाजप कार्यकर्त्यांकडे शांतपणे पाहताना या रीलमध्ये दिसत आहेत. त्यांच्या संयमित प्रतिसादाची चर्चा देखील सध्या सोशलमीडियावर रंगली आहे.

धाराशिवमध्ये चर्चांना उधाण

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर असताना, धाराशिवमधील ही घटना भाजप आणि शिवसेना (उबाठा गट) यांच्यातील संघर्षाचे संकेत देणारी ठरत आहे. कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला उत्साह आणि सोशलमीडियावर सुरू असलेली चर्चा पाहता, आगामी निवडणुका अधिकच रंगतदार होतील, हे स्पष्ट होत आहे. या घटनेमुळे धाराशिवमध्ये राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Omraje Nimbalkar : संविधानापेक्षा मोठे झालात का? तुमच्या बापाचं राज्य आहे का? खासदार ओमराजेंकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी; नेमकं काय घडलं?

तुळजापूर बोगस मतदान नोंदणी प्रकरण! आरोपांशिवाय त्यांच्याकडं दुसरं काही करायला आहे का? राणा जगजीतसिंह पाटलांचा ओमराजेंना टोला