Dharashiv : आज फ्रेंडशिप डे मैत्री साजरा करण्याचा दिवस आहे. पण याच दिवशी धाराशिवमध्ये (Dharashiv) राजकीय कुरघोडी आणि मैत्रीचा नवा अध्याय समोर आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर (MP Omraje Nimbalkar) यांनी महायुती प्रवेश केल्यानंतर आज पहिल्यांदाच भाजप कार्यकर्त्यांसोबत एका मंचावर कार्यक्रमाला हजेरी लावली. भाजप आमदार बसवराज पाटील ( MLA Basavaraj Patil) यांच्या स्वागत कार्यक्रमात भाजपचे दुसरे आमदार असलेल्या राणा जगजीतसिंह पाटलांना डावलण्यात आलं. या ठिकाणी खासदार ओमराज यांना मात्र मानाचे स्थान होतं. यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
बसवराज पाटलांच्या स्वागत कार्यक्रमात कुडघोरी आणि मैत्रीचं नवा अंदाज
या कार्यक्रमाच्या जाहीर व्यासपीठावरुन जुन्या मित्रांना नव्याने मैत्रीची साद घालत दिल से दिल तक हे नातं असल्याचं सांगितलं. ओमराजे निंबाळकर यांचे कट्टर राजकीय विरोधक राणाजगजितसिंह पाटील यांना डावलत हा कार्यक्रम पार पडत होता. भाजपच्या आमदार बसवराज पाटील यांनी ओमराजेंच्या वक्तव्याला दाद देत मैत्रीचं नातं अधिक घट्ट करण्याचं सुतोवाच केलं. यावेळी धाराशिव भाजप मधील असंतोषावर बोलताना भाजपा कोणत्याही एका कुटुंबाची प्रायव्हेट कंपनी नाही असं माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुजितसिंह ठाकूर यांनी ठणकावले. त्यामुळं मैत्रीदिना दिवशी बसवराज पाटलांच्या स्वागत कार्यक्रमात कुडघोरी आणि मैत्रीचं नवा अंदाज यामुळे चर्चेत राहिला.
भारतीय जनता पार्टी म्हणजे कोणाची प्रायव्हेट कंपनी नाही : सुजित सिंह ठाकुर
धाराशिवमध्ये फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने महायुतीत मैत्रीचा नवा अध्याय समोर आल्याचं पाहायला मिळालं. भाजपा आमदार बसवराज पाटलांच्या स्वागत कार्यक्रमात भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना डावलण्यात आलं आहे. तर त्यांचे कट्टर विरोधक आणि नुकताच शिवसेना शिंदे गटाचे प्रवेश केलेले खासदार ओमराजे निंबाळकर यांना मानाचे स्थान देण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.ओमराजेंच्या नव्या मैत्री पर्वाला भाजप आमदार बसवराज पाटलांकडूनही प्रतिसाद मिळाला आहे. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांविरोधात भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर असल्याची चर्चा सुरु आहे. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांनी विरोधातल्या नाराजीला ओमराजे यांच्याकडून फुंकर घालण्यात येत असल्याचंही बोललं जात आहे. यावेळी बोलताना भाजप माजी आमदार सुजित सिंह ठाकुर यांनी भारतीय जनता पार्टी म्हणजे कोणाची प्रायव्हेट कंपनी नाही, असं वक्तव्य देखील केलं आहे.