Narendra Patil : मराठा समाज आणि सरकार यामध्ये अंतर निर्माण करण्याचं काम काही अधिकारी करत असल्याचा खळबळजनक दावा नरेंद्र पाटील यांनी केला आहे. ते धाराशिवमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी नरेंद्र पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली आहे. आता मराठा समाज आणि सरकार यामध्ये असंतोषासाठी कोणते अधिकारी काम करतात?  असा सवाल नरेंद्र पाटलांच्या दाव्याने उपस्थित केला जात आहे. 

Continues below advertisement

अधिकाऱ्यांच्या मनमाणीमुळेच मोठ्या प्रमाणामध्ये अडवणूक

मराठा उपसमिती आणि मंत्री चांगल्या पद्धतीने काम करतात, मात्र मराठा समाजाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट लक्ष घातलं तर अधिक चांगलं होईल असे नरेंद्र पाटील म्हणाले. मराठा समाज आणि सरकार यामध्ये अंतर निर्माण करण्याचं काम काही अधिकारी करत असल्याचा मोठा आणि खळबळ जनक दावा नरेंद्र पाटील यांनी केला. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात अधिकाऱ्यांच्या मनमाणीमुळेच मोठ्या प्रमाणामध्ये अडवणूक झाल्याचंही नरेंद्र पाटील सांगत आहेत. 

मराठा समाजाच्या प्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांनी थेट स्वतः लक्ष घातलं तर अधिक चांगलं होईल 

एकीकडे कुणबी प्रमाणपत्रावरून मनोज जरांगे मैदानात उतरले असताना दुसरीकडे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कामावर नरेंद्र पाटील समाधानी नाहीत. अशा परिस्थितीत उपसमिती चांगलं काम करते असं म्हणत असतानाच नरेंद्र पाटील यांनी मराठा समाजाच्या प्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांनी थेट स्वतः लक्ष घातलं तर अधिक चांगलं होईल असं देखील म्हटले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यासोबत संवाद साधण्यासाठी नरेंद्र पाटलांच्या जिल्हा निहाय बैठका सुरु आहेत. महामंडळाच्या एम डी च्या कारभारावर देखील नरेंद्र पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

Continues below advertisement

जात प्रमाणपत्र देताना काही अधिकारी जाणीवपूर्वक खोडसाळपणा करता

जात प्रमाणपत्र देताना काही अधिकारी जाणीवपूर्वक खोडसाळपणा करतात, असा गंभीर आरोप नरेंद्र पाटील यांनी केला आहे. महामंडळातील अधिकाऱ्यांकडून लावण्यात येणाऱ्या अटी-शर्तींवरून नरेंद्र पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कारवाई झाली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांना एकत्रित करून सरकारविरोधात आंदोलन उभारण्याचा इशाराही नरेंद्र पाटील यांनी दिला आहे. काही अधिकारी अति हुशार  आहेत. जात प्रमाणपत्र देताना खोडसाळपणा करतात, असा थेट आरोप नरेंद्र पाटील यांनी केला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडून लावण्यात येणाऱ्या अटी-शर्तींवरून नरेंद्र पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित अधिकारी मराठा समाजातील असूनही अशा अटी का लावल्या जात आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.