Dharashiv News धाराशिव: धाराशिव जिल्ह्यात दोन दिवसांपासून गूढ आवाज येत असल्याचा प्रकार समोर (Dharashiv News) आला आहे. धाराशिव, कळंब, वाशी आणि भूम परिसरात प्रचंड मोठे गूढ आवाज येत आहे. घरातील भांडी, दरवाजे खिडक्या हादरल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. यापूर्वीही वारंवार गूढ आवाज येत होते. मात्र आता आवाजाची तीव्र असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Continues below advertisement

जिल्हा प्रशासनाने तात्काळ राष्ट्रीय स्तरावरील नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) यांच्याकडे पडताळणीसाठी पाठविली. त्यांच्या तपासणीनुसार या परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नसल्याचे कळविण्यात आले आहे. त्यामुळे सदरील घटना भूगर्भातील नैसर्गिक आवाजाचा प्रकार असण्याची शक्यता आहे. (Dharashiv News)

धाराशिव परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही- (Dharashiv News)

कळंब-धाराशिव परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी कीर्ति किरण पुजार यांनी दिली. तसेच नागरिकांनी घाबरून जाऊ नये, सतर्क राहावे व प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे अनुपालन करावं. अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. मात्र या आवाहनानंतरही गूढ आवाजामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण कायम आहे.

Continues below advertisement

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

ही बातमीही वाचा:

Chhatrapati Sambhajinagar News: खेचले, पाडले, रस्त्यावरुन तरुणीला ओढत नेले; तरुण-तरुणीचा व्हिडीओ व्हायरल, छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडले?

Pune Crime News: मित्रामुळेच आपला ब्रेकअप झाल्याचा संशय; भेटल्यानंतर तिला फोन लावण्यावरून दोघांचा टोकाचा वाद; कोयत्याने सपासप वार अन्..., पुण्यातील हादरवणारा व्हिडीओ