Dharashiv : धाराशिवमध्ये आईची तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी; माय-लेकाचा मृत्यू, दोन चिमुकल्या गंभीर
Dharashiv Naldurg Fort Tragedy : धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ल्यावरून आईने आपल्या तीन चिमुकल्यांसह उडी मारून जीवन संपवलं आहे. यात माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन मुली गंभीर आहेत.

Dharashiv Fort Suicide Tragedy : धाराशिव जिल्ह्यातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. नळदुर्ग (Naldurg Fort) येथील ऐतिहासिक किल्ल्यावरून एका आईने आपल्या तीन निष्पाप चिमुकल्या मुलांसह थेट खाली उडी मारली. या दुर्देवी घटनेत आई आणि एका मुलाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर दोन लहान मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. या भीषण घटनेमुळे संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Naldurg Police Investigation : घटनेमागचे कारण अद्याप अस्पष्ट
घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने मदतकार्य राबवून जखमी चिमुकल्यांना बाहेर काढले. गंभीर जखमी झालेल्या दोन्ही मुलींवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील तातडीच्या उपचारासाठी धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात (Civil Hospital Dharashiv) हलवण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आत्महत्या करणारी महिला ही धाराशिव जिल्ह्यातील उमरगा (Umarga) तालुक्यातील वंताळा गावची रहिवासी असल्याचे समोर आले आहे.
Dharashiv Naldurg Fort Tragedy : टोकाचे पाऊल का उचलले?
त्या माऊलीने पोटच्या तीन लहान लेकरांसह नळदुर्ग किल्ल्यासारख्या उंचावरून उडी मारून इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घरगुती वाद किंवा अन्य काही कारण आहे का, याचा सखोल तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.
माय-लेकाच्या अशा अचानक आणि दुर्दैवी अंतामुळे वंताळा गावावर शोककळा पसरली असून दोन गंभीर जखमी चिमुकल्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली जात आहे.
ही बातमी वाचा:
Before You Go
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha





















