एक्स्प्लोर

'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!

Tanaji Sawant Audio Clip Viral: “पैशावर किती मतदार घेता येतील, हिंगणगावमध्ये किती शक्यता आहे, त्या याद्या व्हॉट्सॲपवर टाका,” अशा स्वरूपाच्या सूचना देण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

Tanaji Sawant Audio Clip Viral: माजी मंत्री तानाजी सावंत याचे ऐन मतदानादिवशी पैसे वाटपाबाबत कथित ऑडिओ संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये कोटी-दोन कोटी खर्च करण्यासही हरकत नसल्याचे स्पष्टपणे ऐकू येत असून, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पैशांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या जात असल्याचा आरोप केला जात आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये पैशाबाबतची चर्चा थेट व्हॉट्सॲपवर करण्याचे निर्देश कार्यकर्त्याला देण्यात आले असल्याचे ऐकू येते. “पैशावर किती मतदार घेता येतील, हिंगणगावमध्ये किती शक्यता आहे, त्या याद्या व्हॉट्सॲपवर टाका,” अशा स्वरूपाच्या सूचना देण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

या चार गावांमध्ये मागे पडायचे नाही

फक्त गोडगोड बोलून उपयोग नाही, प्रत्यक्ष काम दाखवण्यावर भर द्यावा, असे सांगत मुस्लिम आणि दलित वस्त्यांतील मतदारांच्या स्वतंत्र याद्या तयार करून काम सुरू करण्याचे निर्देश दिल्याचे या ऑडिओत ऐकू येते. “दोन घेऊ, तीन घेऊ, कोणी चार घेऊ,” अशा शब्दांत मतदारांवर पैशांचा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप या संभाषणातून पुढे येतो. शिरसाव, हिंगणगाव, जवळा आणि वाकडी या चार गावांमध्ये मागे पडायचे नाही, तिथे कोणताही कॉम्प्रमाईज करायचा नाही, असे स्पष्टपणे सांगितल्याचे या क्लिपमध्ये नमूद आहे. “50 लाख जावो, कोटभर जावो, दोन कोटी जाऊ देत,” असे म्हणत खर्चाच्या मर्यादेची कोणतीही अडचण नसल्याचे कथित विधान या ऑडिओत ऐकू येते. संवेदनशील मतदारसंघ असल्याचे सांगत कोणाचाही विचार न करता याद्या तयार करून तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश दिल्याचा आरोप आहे. कोणाशीही चर्चा न करता, एक शब्दही बाहेर न जाता सर्व माहिती फक्त व्हॉट्सॲपवर पाठवण्याचे आदेश दिल्याचेही या संभाषणात ऐकू येते.

सभा मोठी झाली म्हणून गाफील राहू नका

सभा मोठी झाली म्हणून गाफील राहू नका, लागेल ते मला सांगा, मी बरोबरच आहे, असे सांगत संपूर्ण प्रक्रियेवर थेट नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा केला जात आहे. या कथित ऑडिओ क्लिपमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सोशल मीडियावर या क्लिपची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shirdi Sai Baba Temple : शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
Iran War Live Update: तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
Pune Crime News: पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirdi Sai Baba Temple : शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
Iran War Live Update: तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
Pune Crime News: पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
Satara News: चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Iran War Live Update: इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
Embed widget