एक्स्प्लोर

Wrestler Ashwini Mohite Paul Dharashiv News: महाराष्ट्राच्या वाघिणी'चा दुर्दैवी अंत; महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी, धाराशिवमधील थरकाप उडवणारी घटना

Wrestler Ashwini Mohite Paul Dharashiv Umarga Naldurg Fort News: राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी 3 लहान मुलांसह ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावरून उडी घेतली.

Wrestler Ashwini Mohite Paul Dharashiv Umarga Naldurg Fort News: धाराशिवमधून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटूने आपल्या तीन लहान मुलांसह ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावरून 100 फूट खोल दरीत उडी घेतली आहे. या थरकाप उडवणाऱ्या घटनेत कुस्तीपटू अश्विनी पौळ (Wrestler Ashwini Mohite Paul) आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचा जागीच मृत्यू झाला. तर अडीच वर्षांच्या जुळ्या मुलींपैकी क्रांती नावाच्या चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच जुळ्या मुलींपैकी दुसरी मुलगी वीरा ही गंभीर जखमी असून, तिच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत.

अश्विनी मनोहर पौळ असे या महिला कुस्तीपटूचे नाव असून, तिला कुस्ती क्षेत्रात 'महाराष्ट्राची वाघीण' म्हणून ओळखले जात होते. राष्ट्रीय स्तरावर कुस्तीत नाव कमावलेल्या अश्विनी पौळ यांनी आपल्या कारकिर्दीत 5 सुवर्ण आणि 6 रौप्य पदके जिंकून महाराष्ट्राचा गौरव वाढवला होता. मात्र मुलांना घेऊन आत्महत्येचं टोकाचे पाऊल उचललेल्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि क्रीडा जगतातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.पती आणि सासरच्या मंडळींच्या सततच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळूनच मुलीने आत्महत्या केल्याचा अश्विनी यांच्या वडिलांनी गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे आता सदर घटनेची पोलीस चौकशी करत आहेत. (Wrestler Ashwini Mohite Paul Dharashiv)

किल्ल्याच्या उपळी बुरुजावरून पहिले मुलांना फेकलं, त्यानंतर स्वतः उडी मारली- (Wrestler Ashwini Paul Death Marathi News)

सदर प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. केक घेऊन मुलांसह अश्विनी पोळ नळदुर्ग किल्ल्यावर पोहोचल्या होत्या. मुलांसह आगोदर केक कापला आणि त्यानंतर नळदुर्ग किल्ल्याच्या उपळी बुरुजावरून पहिले मुलांना फेकलं, त्यानंतर स्वतः उडी मारल्याचे समोर आले आहे. कुस्तीपटू असलेली अश्विनी आपल्या तीन मुलांना घेऊन किल्ल्यावर गेली. सोबत केक घेऊन गेली. किल्ल्यात केक कापायला बंदी असल्याने केकमध्ये घेऊन जाता आले नाही. बाहेर केक कापला, किल्ल्यात असलेल्या छोट्या दुकानदारांकडून चॉकलेट घेतले. अंगावर काटा येणारी माहिती म्हणजे मृत मुलाच्या तोंडात चॉकलेट आढळून आले. अगोदर मुलांना बुरुजावरून फेकत अश्विनी यांनी उडी मारली. दुर्दैवी घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून एका मुलीची मृत्यूची झुंज सुरू आहे. मृत अश्विनीच्या वडिलांच्या तक्रारीवरून तिच्या पती आणि सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कौटुंबिक त्रासाला कंटाळून अश्विन हे टोकाचे पाऊल उचलल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. फॉरेन्सिक टीम सह पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. 

अश्विनीच्या वडिलांचा गंभीर आरोप- (Ashwini Paul Death)

अश्विनी या मुंबईत महाराष्ट्र सुरक्षा दल (MSF) मध्ये नोकरी करत होत्या. पती मनोहर पौळ यांच्या सांगण्यावरून त्यांनी काही महिन्यांपूर्वी नोकरीचा राजीनामा दिला होता. मागील तीन महिन्यांपासून त्या आपल्या मुलांसह माहेरी राहत होत्या. माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या मानसिक त्रासामुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

अश्विनी पौळ यांची महाराष्ट्राची वाघिणी' अशी ओळख- (Wrestler Ashwini Mohite Paul Dharashiv Marathi News)

  • अश्विनी पौळ (मोहिते) या राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट महिला कुस्तीपटू होत्या, क्रीडा क्षेत्रात त्यांना 'महाराष्ट्राची वाघिणी' म्हणून ओळखले जात होते.
  • कुस्तीपटूंचे संपूर्ण कुटुंब: अश्विनी यांच्या कुटुंबात वडील, भाऊ, आई आणि बहीण हे सर्वच कुस्तीपटू आहेत; विशेष म्हणजे त्यांचे पती मनोहर पौळ हे देखील कुस्तीपटू आहेत.
  • घरातूनच मिळाले कुस्तीचे बाळकडू: वडिलांना कुस्तीची आवड असल्याने त्यांनी जिद्दीने मुलीसाठी घरीच कुस्तीची तालीम (सराव केंद्र) तयार केली होती.
  • राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्ण पदके: 2007 मध्ये तिरुवनंतपुरम (केरळ) येथील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक, तर 2008 व 2009 मध्ये गुरुदासपूर (पंजाब) आणि चेन्नई येथील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पटकावले सुवर्ण पदक.
  • 5 सुवर्ण आणि 6 रौप्य पदके: 2010 मध्ये भोपाल, कानपूर आणि हरियाणा, तसेच बालेवाडी (पुणे), कन्याकुमारी आणि सैफई (लखनऊ) येथील राष्ट्रीय स्पर्धा गाजवत संपूर्ण कारकिर्दीत 5 सुवर्ण आणि 6 रौप्य पदकांवर कोरले नाव.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget