Dharashiv News : राज्यभरातपावसानेएकच हाहा:कार केल्याचेचित्रआहे. त्यातचमराठवाड्यातीलअनेकजिल्ह्यातअतिवृष्टीनेअक्षरशःझोडपूनकाढलंआहे. याचपावसाचाफटकाधाराशिव जिल्ह्यातील(Dharashiv News) अनेकगावांनाबसलाआहे. स्थानिक प्रशासनआणिएनडीआरएफच्या (NDRF) पथकालाघटनास्थळीपाचारणकरण्यातआलेअसूनपुराच्यापाण्यात अडकलेल्या नागरिकांचेबचावकार्यसुरुआहे. अशातचधाराशिवाचे (Dharashiv News) शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) हेदेखील स्वतः पाण्यातउतरून पुराच्या पाण्यात अडलेल्या नागरिकांच्यामदतीसाठीसरसावल्याचेबघायलामिळालेआहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या आजी आणि नाताला वाचवण्यासाठी त्यांनीथेटपाण्यातउतरूनबचावकार्यातमदतकेलीआहे. ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः फेसबुक पोस्ट करत याबाबतची माहिती देत एनडीआरएफ टीमचेहीआभारमानलेआहे. तरदुसरीकडे ओमराजे निंबाळकर यांचीमदतकार्यपाहूनमनसेचेनेतेबाळनांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनीदेखील खासदार ओमराजेंचेतोंडभरूनकौतुककेलंआहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांची फेसबुक पोस्ट नेमकीकाय?
धाराशिवजिल्ह्याच्या वडनेर ता. परंडा येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील एकाआजीसह 2 वर्षाचा मुलगा आणि 2 व्यक्ती रात्री 2 वाजल्यापासून पूर्ण पाण्याने वेढले होते. सोबतच स्वतःच्या घरावर अन्न व पाण्यविणा मदतीच्या अपेक्षेने ते अडकले होते. परिणामी NDRFच्या जवांनाच्या मदतीने मी स्वतः या कार्यात सहभागी होऊन कुटुंबाला सुखरुपपणे बाहेर काढण्यासाठी संध्याकाळी 8 वाजता यश आल्याने मनाला खूप समाधान मिळाले..! या कार्यात NDRFच्या जवानांनी आणि गावकऱ्यांनी देखील कष्ट आणि मेहनत घेऊन सदरील बचावकार्य यशस्वीरित्या पार पाडले, याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व अभिनंदन..!
सध्याच्या राजकारणातील कोहिनूर- बाळानांदगावकर
नव्या युगातील राजकारण आणि राजकारणी याबद्दल सामान्य जनतेत खुप चांगल्या भावना नाही. या वातावरणात सर्वांनाच दिलासा देणारे नाव म्हणजे ओमराजे निंबाळकर. हा तरुण खासदार म्हणजे केवळ धाराशिव नव्हे तर पूर्ण राज्याला आपलासा वाटणारा चेहरा. आदर्श राजकारणी कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण. अनेक अमिषे, दबाव आला तरी एकनिष्ठ राहून राजकारण केले. त्यामुळेच सुमारे 3.30 लाख मतांनी निवडून आले. ओम बद्दल मी अनेकदा ऐकून असतो की तो कायम जनतेसाठी उपलब्ध असणारा लोकप्रतिनिधी आहे. तसेच सामान्य जनतेचा आधारवड आहे. असेहीबाळानांदगावकरत्यांच्याफेसबुकपोस्टमध्येम्हणालेआहे.
राजकारणी म्हणून नव्हे तर ओम राजे तुझा मोठा भाऊ म्हणून अभिमान
सध्या पावसाने थैमान घातले असताना देखील केवळ कोरड्या गप्पा न मारता थेट ग्राउंड वर उतरून प्रसंगी लोकांसाठी जीव धोक्यात घालून तो अतिशय पुण्याचे काम करत आहे. या सगळ्याबद्दल ओम तुझे कौतुक करण्यास शब्द कमी आहेत. नवीन पिढी ने राजकारणाचा तिरस्कार करण्याआधी ओमकडे बघावे आणि गलिच्छ राजकारणात ही कोहिनूर हिरा कसा असतो हे लक्षात येईल. बॉलिवूड सेलिब्रिटीला आयडॉल मानणाऱ्या लोकांनी ओमराजेला आयडॉल मानून वाटचाल करायला हवी. ओम तु लोकप्रतिनिधी म्हणून जे जे काही करत आहे ते उत्कृष्ट असेच आहे, पण हे करताना तू स्वतः ची काळजी घे कारण तुझ्यावर लाखो लोक जिवापाड प्रेम करतात आणि या सर्वांसाठी तुझे असणे हे अधिक महत्वाचे आहे.राजकारणी म्हणून नव्हे तर ओम राजे तुझा मोठा भाऊ म्हणून मला तुझा खुप अभिमान आहे. असेहीबाळानांदगावकरत्यांच्याफेसबुकपोस्टमध्येम्हणालेआहे.
आणखी वाचा
