Dharashiv News : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी 29 ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनाची धाराशिवमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये चावडी बैठका घेत 29 ऑगस्टच्या आंदोलनाबद्दल मराठा बांधव जनजागृती करत आहेत. आतापर्यंत मुंबईच्या आंदोलनासाठी दहा हजार गाड्यांचं बुकिंग झाल आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा फोटो असलेले आणि त्यावरती चलो मुंबई अशा आशयाचे बॅनर आणि पॅम्प्लेट छापण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या गाठीभेटी दौऱ्यानंतर मराठा कार्यकर्त्याकडून चावडी बैठकांमधून समाजजागृती करण्यातयेतआहे. त्यामुळेमराठा आरक्षणाच्यालढ्याचा 29 ऑगस्टला मुंबईतपुन्हाएकदामराठयांचा एल्गार पाहायलामिळणारअसल्याचादावामराठाआंदोलकांनीकेलाआहे.
मनोज जरांगे पाटील यांचाइशारा
मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबई आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गावागावांमध्ये चावडी बैठकींचे आयोजन करण्यात येत असून, या माध्यमातून समाज एकत्र आणण्याचे काम सुरू आहे. याच अनुषंगाने नुकतीचधाराशिव शहरात बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत राजकीय नेत्यांना इशारा दिला आहे. यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, जो नेता 29 ऑगस्टला मुंबईच्या आंदोलनात सहभागी होणार नाही, त्याला आगामी नगरपालिका, पंचायत समिती, महानगरपालिका निवडणुकांमध्ये पाडा, असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले आहे. मनोज जरांगे यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तर 29 ऑगस्टच्या मुंबई येथील आंदोलनामध्ये मराठा बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
आता मराठा नेतेही शरद पवारांच्या मंडल यात्रेवर नाराज
मंडल आयोगाच्या समर्थनार्थ शरद पवारांनी नागपूर येथून मंडल यात्रेस सुरुवात केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पवारांवर सडकून टीका केली होती. आता थेट मराठा समाजातूनही पवारांच्या विरोधात आवाज उठण्यास सुरुवात झाली असून शरद पवार यांनी मंडल यात्रे ऐवजी 23 मार्च 1994 च्या जीआर संदर्भात यात्रा काढण्याचे आवाहन मराठा समन्वयक धनाजी साखळकर यांनी दिले आहे. शरद पवार यांनी 23 मार्च 1994 रोजी जो जीआर काढला त्या जीआरमुळे मराठा समाजाच्या घरादारावर नांगर फिरवला गेला. गोरगरीब मराठा समाजाचे हक्काचे सोळा टक्के आरक्षण पवारांनी खैरातीसारखे वाटून टाकले त्यामुळे त्यांना काढायचीच असेल तर 23 मार्च 1994 च्या जीआर मुळे मराठा समाजाचे कशा पद्धतीने नुकसान केले यासंदर्भात यात्रा काढण्याचे आवाहन धनाजी माने साखळकर यांनी दिले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
