Dharashiv Accident News: धाराशिवच्या उमरगा (Omerga Accident) शहराजवळील बायपास रोडवर भीषण अपघाताची घटना घडली आहे.  या भीषण अपघातात बहीण भावाचा जागीच मृत्यू झाला आहे. उमरगा तालुक्यातील कोळसूर (गुंजोटी) येथील रहिवाशी शिवाप्पा आणि त्यांची बहीण अनिता माळी यांचा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय. उमरगा शहराच्या बायपास रस्त्याकडे जात असताना हैद्राबादकडे भरधाव वेगाने निघालेल्या आयशर टेम्पोने पाठीमागून दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, टेम्पोने दोघांनीही अक्षरक्ष: फरफटत नेलंय. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या समोर आला असून तो समाज माध्यमांवरही व्हायरल झाला आहे.

बहीण-भावाचा जागीच दुर्दैवी अंत, अंगावर काटा आणणार व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक बाब म्हणजे या अपघातानंतर आयशर टेम्पोने चालकाने टेम्पोवाहान न थांबवता तो अधिक वेगाने पळवत नेला आहे. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीही या टेम्पोमध्ये अडकून काही अंतर फरफटत गेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या सुसाट आयशर टेम्पो ने दुचाकीला अर्धा किलोमीटर ढकलत नेल्याचे सांगितलं जातंय.सध्या फरार आयशर टेम्पो चालकाचा शोध सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहे. मात्र अपघातात दोघा बहीण भावाचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात एकच शोककळा पसरली आहे.      

मालवाहू ट्रकवर कोसळली कमान

यवतमाळच्या पुसद शहरातील पुसद-वाशिम मार्गावरील जागृत श्रीधनकेश्वर महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या मोठ्या कमानीला मालवाहू ट्रकने जबर धडक दिली. अशातच सदर कमान ट्रकच्या केबिनवर ढासळली. यामध्ये ट्रकचा चालक काही काळ अडकला होता. नागरिकांच्या मदतीने त्याला बाहेर कडण्यात आले. जखमी चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याघटनेत कुठलीही जीवित हानी घडली नसली तरी या अपघातात मात्र कमानीचे मोठे नुकसान झाले आहे.

 

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आणखी एक आरोपीला अटक 

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील व्याप्ती दिवसागणिक वाढत असताना या प्रकरणी आणखी एक आरोपीला अटक करण्यात आली आहे. पंचायत समितीचे माजी उपसभापती असलेल्या शरद रामकृष्ण जमदाडे याला पोलिसांनी अटक केली आहे. तो गेल्या महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देत होता. तुळजापूर तालुक्यातील कामठा या त्याच्या मूळ गावातून शुक्रवारी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.  मात्र तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 16 आरोपी अटकेत असले तरी अजूनही 20 आरोपी फरार आहे. 

हे ही वाचा