Jain Community Dharm Sabha: जैन समुदायाकडून कबुतरांच्या आत्मशांतीसाठी दादरमध्ये धर्मसभेचं आयोजन; कबुतरांचा वाद पुन्हा पेटणार?
Jain Community Dharm Sabha: दादरमध्ये जैन समुदायाकडून मृत कबुतरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. आज (11ऑक्टोबर) दादरच्या योगी सभागृहात ही प्रार्थनासभा पार पडेल.

Jain Community Dharm Sabha: दादरमध्ये जैन समुदायाकडून मृत कबुतरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. आज (11ऑक्टोबर) दादरच्या (Dadar) योगी सभागृहात ही प्रार्थनासभा (Pigeon Prayer Meeting) पार पडेल. मुंबईतील कबूतरखाने पुन्हा सुरू व्हावेत, अशी मागणी देखील या प्रार्थनासभेतून करण्यात येणार आहे. कबुतरांच्या मृत्यूमुळे जैन समुदायात (Jain Community) चिंता व्यक्त होत आहे. कबूतरखाने बंद झाल्याने अनेक कबुतरे रस्त्यावर येत असून, अपघातांमध्ये त्यांचा मृत्यू होत असल्याचा दावा समुदायाकडून केला जात आहे. या प्रार्थनासभेच्या माध्यमातून कबुतरांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली जाईल. मुंबईतील कबूतरखान्यांच्या मुद्द्यावर सध्या सुरू असलेल्या चर्चेच्या (Kabutar Controversy) पार्श्वभूमीवर या प्रार्थनासभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
Dadar Pigeon Prayer Meeting : शांतीदूत कबूतरांच्या आत्मशांतीसाठी’ दादरमध्ये धर्मसभा
दरम्यान, जैन धर्मातील अहिंसेच्या तत्त्वानुसार, कबुतरांना अन्न देणे आणि त्यांचे संरक्षण करणे महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे कबूतरखाने पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. दादरच्या योगी सभागृहात ‘शांतीदूत कबूतरांच्या आत्मशांतीसाठी’ एक धर्मसभा पार पडणार आहे. मुंबईतील कबूतरखाने बंद करण्याच्या निर्णयामुळे अनेक कबूतरांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात असून, त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी ही सभा जैन समाजाकडून आयोजित करण्यात आली आहे.
अशातच, आजच्या या धर्मसभेत मुंबईतील सर्व आचार्य, साधू आणि साध्वीजी सहभागी होणार आहेत. ‘कबूतर बचाओ – जीव दया अपनाओ’ असा संदेश या सभेद्वारे देण्यात येणार आहे. ही सभा सकल जैन समाज मुंबई आणि राजस्थानी छत्तीस कोम मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. तर सहआयोजक म्हणून महावीर मिशन ट्रस्ट, थ्री अॅण्ड दिया फाऊंडेशन आणि कुलाबा सकल जैन संघ यांचा सहभाग आहे. त्यामुळे या सभेवेळी नेमका काय निर्णय घेतला जातो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मुंबईत आज जैन समुदायाकडून दादरमध्ये मृत कबुतरांच्या आत्माच्या शांतीसाठी धर्मसभेचं आयोजन करण्यात आले आहे. दादर पूर्व स्वामी नारायण मंदिरातील योगी सभागृहात ही धर्मसभा होणार आहे. शेरी एड दिया फाउंडेशन मुख्य आयोजक असून महावीर मिशन ट्रस्ट, कुलाबा सकल जैन संघ या संस्थाच्या वतीने ही धर्मसभा घेण्यात येत आहे. पूर्वापार चालत आलेले कबूतर खाने सुरू राहावेत, अशी मागणी या धर्मसभेतून करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यासाठी मुंबईतून जैन बांधव सामील होत आहेत. तर अनेक जैन धर्मगुरू देखील शामिल होणार आहेत. निलेश मुनी महाराज प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
Kabutar Controversy : मुंबईत कबुतरांचा वाद पुन्हा पेटणार?
काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने शहरातील कबुतरखाने बंद करण्याचा सपाटा लावला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली होती. मात्र, जैन समाजाने (Jain Community) या कारवाईला कडाडून विरोध केला होता. याविरोधात निदर्शने करण्यात आली होती. मुंबईच्या दादर परिसरात जैन समाजाने रस्ता रोखून धरत मुंबई महानगरपालिकेने कबुतरखान्यावर (Dadar Kabutar Khana) लावलेली ताडपत्री चाकू आणि सुऱ्यांनी फाडून काढली होती. मात्र, यानंतरही मुंबई महानगरपालिका (BMC) आपल्या भूमिकेवर ठाम राहिली होती.
परंतु, जैन समाजाच्या काही मुनींना विनाकारण आक्रमक भाषा वापरत राज्य सरकार आणि न्यायव्यवस्थेला ललकारले होते. मात्र, प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने दादरचा कबुतरखाना बंदही झाला होता आणि या सगळ्यावरुन रंगलेले राजकारणही आपोआप थंडावले होते. मात्र, आता जैन समाजाच्या एका नव्या कृतीमुळे हा कबुतरखान्यांचा हा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.
हे हि वाचा


















