Crime News: सध्याच्या काळात मोबाईल वापरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र याच माध्यमातून लोकांना फसवण्याचे प्रमाणही वाढले आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. 'ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब' च्या नावाखाली अनेकांची फसवणुक केली जात असल्याचे समोर आले आहे. 

एक तरुण त्याच्या सोशल मीडिया पेजवर स्क्रोल करत होता. यावेळी त्याची नजर 'ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब सर्व्हिस' च्या पेजवर पडली. महिलेला गर्भवती करण्याच्या बदल्यात लाखो रुपये कमवण्याची आकर्षक ऑफर या पेजवर देण्यात आली होती. यामध्ये, श्रीमंत कुटुंबातील महिलांना हॉटेलमध्ये रात्र घालवण्याचे आमिष दाखवले जात होते आणि त्यांना मोठी रक्कम देऊ केली जात होती. पीडित तरुणाने पेजवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क केला. मात्र फोन उचलला नाही. यानंतर काही वेळाने एका अनोळखी नंबरवरून फोन आला आणि तुम्हाला या नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर 1200 रुपये भरुन नोंदणी करुन घ्या...नोंदणी केल्यानंतर तुम्हाला भेटण्यासाठी बंगळुरुला यावे लागू शकते. तसेच तुमची नोंदणी झाल्यानंतर गर्भवती होणाऱ्या महिलेची माहिती पाठवली जाईल, असे सांगण्यात आले. 

8 लाख कमवण्याची दिली ऑफर-

पीडित तरुणाला पहिल्या महिन्यात 3 लाख ते 8 लाख रुपये कमवण्याची ऑफर देण्यात आली होती. पीडित तरुणाने जवळपास 20,000 हजार रुपये जमा केले. यामध्ये काही न्यायालयीन कागदपत्रांसाठी 2850 रुपये, सुरक्षा पैशासाठी 15,500 रुपये आणि उर्वरित जीएसटीच्या नावाखाली ही रक्कम त्याच्याकडून घेण्यात आली. संबंधित तरुणाला न्यायालयात सादर करायच्या सर्व पावत्या आणि कराराची कागदपत्रे दाखवली.पीडित तरुणासोबत दोन वेगवेगळे करार करण्यात आले. ज्यावर 'बाळ जन्म करार', एनओसी, 'गर्भधारणा पडताळणी फॉर्म' होता. संबंधित तरुणाचा विश्वास जिंकण्यासाठी जवळपास 10 ते 12 महिलांचे फोटोही पाठवले. पाठवलेल्या फोटोंमधून एक महिलेला निवडण्यास सांगितले गेले. तसेच याआधी तुमच्या बँक खात्यात 2 लाख 15 हजार 500 रुपये पाठवले जात आहे, परंतु 10,500 रुपये आयकर म्हणून तुम्हाला आधी जमा करावे लागतील, असं पीडित तरुणाला सांगितले. पीडित तरुणाने ही रक्कम जमाही केली. सदर रक्कम पाठवली पण त्याला हॉटेलमध्ये बोलावण्यात आले नाही किंवा त्याच्या खात्यात पैसे आले नाहीत, म्हणून त्याने पैसे परत करण्याची मागणी केली. त्यानंतर त्याने संबंधित क्रमांकावर कॉल केला, परंतु फोन बंद असल्याचे समोर आले. 

घोटाळेबाजांच्या टोळीला अटक-

सायबर पोलिसांच्या मते, घोटाळेबाज बहुतेक बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमधून काम करत आहेत. अलिकडेच, वेगवेगळ्या राज्यांच्या पोलिसांनी घोटाळेबाजांच्या टोळीला अटक केली. अंदाजानुसार, आतापर्यंत देशभरातील हजारो तरुण या घोटाळ्याचे बळी ठरले आहेत. परंतु, लाज आणि बदनामीच्या भीतीमुळे, पोलिसांकडे तक्रारींचे प्रमाण खूपच कमी आहे. ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब नावाची अनेक पेज आहेत. या पेजची जाहिरात गुगल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केली जाते. जेणेकरून लोकांना ते लक्षात येईल. महिलांचे फोटो/व्हिडिओ देखील अपलोड केले जातात. हे एआय जनरेटेड इमेजेस आणि व्हिडिओ आहेत.

सावधा राहा-

१. अशा नोकऱ्यांच्या संशयास्पद वेबसाइट आणि लिंक्स टाळा.२. कल्पनारम्य गोष्टी टाळा, आगाऊ पैसे देऊ नका.३. अनोळखी व्यक्तींसोबत वैयक्तिक माहिती शेअर करू नका.४. बँक तपशील, आधार क्रमांक, पॅन कार्ड तपशील शेअर करू नका.५. अशा ऑफर्सवर फोन कॉल टाळा६. जर तुम्ही फसवणुकीचे बळी असाल तर पोलिसांना नक्की कळवा.

ही बातमीही वाचा-

Yuzvendra Chahal-Dhanashree Verma Divorce: धनश्रीने अचानक त्या जागेवर पाय ठेवला अन् चहल खुर्चीवरुन खाली पडला, घटस्फोट प्रकरणात नवा अँगल