Mumbai News : एसटी बँकेच्या वार्षिक अहवालामुळे नवा वाद होण्याची शक्यता बळावली आहे. त्याचे कारण म्हणजे स्टेट ट्रान्सपोर्ट को - ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबईचा (State transport co.op Bank) 2024-25 चा 72वा अहवालात छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) शेजारी नथुराम गोडसेच्या (Nathuram Godse) फोटोला स्थान देण्यात आले आहे. एसटी बँकेच्या वार्षिक अहवालच्या मुख्य पृष्ठावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाजूलाच नथुराम गोडसे यांचा फोटो लावण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यात बळावली आहे. शिवाजी महाराजांच्या बाजूला नथुराम गोडसे यांचा फोटो छापल्याने हा वाद होण्याची शक्यता आहे.
शिवाजी महाराजांच्या शेजारी नथुराम गोडसेला स्थान, ATM कार्डवर कमळाचे फुल
एसटी बँकेच्या वार्षिक अहवालच्या मुख्य पृष्ठावर छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्री राम आणि नथुराम गोडसे यांचे अहवालाच्या मुख्य पृष्ठभागावर फोटो छापण्यात आले आहेत. दोन दिवसापूर्वी या अहवालचे प्रकाशन झालं असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या अहवालाच्या मुख्य पृष्ठावर भाजप आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, ॲड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) तसेच जयश्री पाटील यांचे देखील फोटो छापण्यात आले आहेत. याच अहवालाच्या मुख्य पृष्टावर बँकेच्या ATM कार्डची देखील जाहिरात देण्यात आली असून या ATM कार्डवर कमळाचे फुल असल्याचे जाहिरातीतून दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे आता बँकेचे ATM तसेच बँकेचा वार्षिक अहवाल यावरून वाद होण्याची शक्यता आहे.
याअगोदर देखील एसटी बँकेच्या निवडणुकीत सदावर्ते पॅनलचा विजयी झाला तेव्हा सदावर्ते यांनी विजयी मिरवणुकीत नथुराम गोडसे यांचे फोटो दाखवले होते. त्यामुळे आताच्या या फोटोमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिनाताई ठाकरे स्मृती स्थळ प्रकरणात 2 पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई
छत्रपती शिवाजी पार्कातील मिनाताई ठाकरे स्मृती स्थळ प्रकरणात 2 पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. स्मृतीस्थळाच्या ठिकाणी त्या दोन पोलिसांची गस्त ठेवण्यात आली होती. मात्र, त्या दिवशी दोन्ही पोलीस त्या ठिकाणी नव्हते. या घटनेनंतर दोघांना कारणेदाखवा नोटीस बजावून खाते अंतर्गत चौकशीच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. या चौकशीत दोघंही दोषी आढळून आल्याची माहिती मिळाली असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या