CM Devendra Fadnavis Tiranga Rally : संपूर्ण भारत भारतीय सैन्याच्या आणि देशाच्या पंतप्रधानाच्या पाठीशी आहे. त्यामुळे केवळ शहरात किंवा मोठ्या गावातच नाही, तर ग्रामपंचायत स्तरावरही प्रत्येक व्यक्ती हा सैन्याच्या पाठीशी उभा आहे, हे आज दर्शवलं गेलंय. किंबहुना हेच सर्वत्र पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर खापरखेडा येथे तिरंगा यात्रा काढली गेली. अतिशय भव्य अशी तिरंगा यात्रा खापरखेडा येथे काढण्यात आली. आशिष देशमुख यांनी सगळ्या पक्षाच्या लोकांना आमंत्रित केलं होतं. कारण इथे पक्षाचा विषय नाही, तर ही भारताची तिरंगा यात्रा आहे. आज भारताची डिफेन्स कॅपॅबिलिटी पाकिस्तान (India Pakistan War) पेक्षा चार ते पाच पट जास्त आहे. सैन्य क्षमता पाहता जगातील पहिल्या पाच मध्ये भारताचा समावेश आहे. पाकिस्तानने गुडघे टेकल्यावर भारताने युद्धविराम केलंय. त्यामुळे 'सुन ले बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्तान...' असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी पाकड्यांना खडे बोल सुनावले आहे. 

नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात खापरखेडा या गावात आज (18 मे) तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांनी ही तिरंगा यात्रा आयोजित केली असून या तिरंगा यात्रेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही सहभागी झाले आहेत. खापरखेडा येथील अन्नामोड या चौकातून ही तिरंगा यात्रा सुरू झाली असून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुमारे एक किलोमीटर या यात्रेत सहभागी झाले आहेत. तिरंगा यात्रा संपुष्टात आल्यानंतर एक छोटी सभा झाली. त्या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय.

आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडियाला तेव्हा लोक जुमला म्हणायचे, मात्र आज.. 

आपल्यासाठी ही अभिमानाची बाब आहे की, आपलं वॉर डॉमिनन्स युद्ध आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये पाहायला मिळाल आहे. हे आपण आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या शस्त्रामुळे करू शकलो. जेव्हा देशाचे प्रधानमंत्री 2014 मध्ये मेक इन इंडियाचा नारा द्यायचे. तेव्हा लोक जुमला आहे असं म्हणत होते. मात्र आता इतर देश आपल्याला शस्त्राची मागणी करत आहे. ब्राह्मोस या आपल्या डिफेन्स कॅपॅबिलिटीची मागणी जग करत आहे. स्वतःच देशाचं संरक्षण करण्यासाठी सर्वात अद्यावत शस्त्रास्त्र हे भारताकडे आहे हे जगाला कळलं आहे. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

तुर्की दहशतवादाला पाठिंबा देतोय, हा मानवते विरुद्धचा अपराध 

तुर्की सारखा देश दहशतवादाला पाठिंबा देतोय. मानवते विरुद्धचा हा अपराध आहे. त्या विरोधात भारतीयांनी व्यवहार करण्यास नकार दिला, त्या बद्दल मी भारतीयांचे स्वागत करतो. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

काँग्रेसने जय हिंद यात्रा राजकीय यात्रा करू नये, ही अपेक्षा- मुख्यमंत्री 

काँग्रेसने जय हिंद यात्रा काढली. आमची अपेक्षा एवढीच असेल की त्यांनी ती यात्रा राजकीय यात्रा करू नये. आपल्या सेनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू नका. ज्या पद्धतीने राहुल गांधी कालपासून बोलायला लागलेत, भारतीय सेनेप्रति अविश्वास त्यांच्या बोलण्यातून दिसत आहे. एकीकडे सेनेवर अविश्वास दाखवतात, दुसरीकडे जय हिंद यात्रा काढता, जयहिंद तेव्हाच म्हणता येईल जेव्हा सेनेच्या पाठीशी तुम्ही विश्वास दाखवाल. असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

हे ही वाचा 

Operation Sindoor : पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली अन् भारतीय सैन्याला हवं होतं तेच घडलं! अवघ्या 23 मिनिटात पाकड्यांचा करेक्ट कार्यक्रम!