व्हॉइस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इंटरप्राईजेस या खाजगी कंपनीकडून नागपूर जिल्ह्यातील हे गाव विकसित करण्यात येत आहे. आत्मनिर्भर भारत मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी दूरसंचार क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी मानली जाणारी व्हाईस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या वतीने देशातील प्रायोगिक तत्वावरील पहिला स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून सातनवरीचा विकास केला जात आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, यांच्यासह स्थानिक आमदार उपस्थित होते.
आज आपण खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत या धोरणासह प्रगती करतोय- देवेंद्र फडणवीस
पंतप्रधान मोदींनी ओळखले होते कि, गावोगावी कॉम्म्युनिकेशन सुविधा, तंत्रज्ञान पोहोचविले तरच गाव विकसित होतील. त्यासाठी 2014 ते 19 दरम्यान गावागावात फायबर ऑप्टिक पोहोचवण्यासाठी भारत नेट व महाराष्ट्र नेट ही सुविधा सुरू केली होती. नंतरच्या काळात त्यावर आधारित तंत्रज्ञान वापरण्यात आपण मागे पडलो होतो. सुदैवाने सरकार पुन्हा आलं आणि त्या दिशेनं पुन्हा काम सुरू झालंय. परिणामी, सातनवरी गावात अत्याधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी ज्या कंपन्यांनी ( सुमारे 24 कंपनी) पुढाकार घेतला, प्रयत्न केले, त्या सर्व कंपन्या भारतीय आहे. त्यामुळे आपण खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत या धोरणासह प्रगती करतो आहे. असे हि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
जागतिक बाजारपेठ आज शेतमालाचे भाव ठरविते. इतर देशांचे उत्पादन खर्च कमी आहे. कारण ते तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करतात. कमी खर्चात जास्त उत्पादन करतात. त्यामुळे कमी भावात ते बाजारात शेतमाल विकू शकतात. भारतात मात्र उत्पादन वाढवताना उत्पादन खर्च ही वाढत आहे. खतांवर सरकार सबसिडी देते, खतांचा वापर वाढल्याने जमिनीची उत्पादकता कमी झाली आहे. त्यासाठी पुन्हा खते वापरले जात आहे. आपण तंत्रज्ञानाचा वापर करून खत व्यवस्थापन आणि कीड नियंत्रण केले, तंत्रज्ञानाचा वापर करून आवश्यक तेवढाच सिंचन दिले तर आपण उत्पादकता वाढवू शकतो. असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
शेतीत तंत्रज्ञानाचा वापर केल्याने पाण्याची बचत होईल- - देवेंद्र फडणवीस
शेतीत तंत्रज्ञानाचा वापर केल्याने पाण्याची बचत होईल, खत आणि औषधांचा वापर करून शेती समृद्ध करता येईल. प्रत्येकाने माती परीक्षण केली पाहिजे. होणाऱ्या रोगांपैकी 90 टक्के रोग पाण्यामुळे होतात. थोड्या तंत्रज्ञानाच्या वापराने पाण्याची गुणवत्ता सुधारता येईल. सातनवरी गावातील नागरिकांना प्रत्येक वेळेला नागपूरच्या रुग्णालयात जाण्याची आवश्यकता नाही. तर डिजिटली त्यांना डॉक्टरचा सल्ला घेता येईल, तुमचे रिपोर्ट डॉक्टरला डिजिटली उपलब्ध होतील. असेही ते म्हणाले.
या गावात डिजिटल सुविधाच्या माध्यमातून ई आरोग्य सेवा, ई शिक्षण, स्मार्ट शेती, स्मार्ट सिंचन, स्मार्ट पंचायत, शेतातील फवारणी ड्रोन नियंत्रित आणि कीटकनाशक फवारणी इत्यादी कामे केली जाणार आहे. शेती क्षेत्रात पाण्याची बचत, खताची बचत, यासह डिजिटल सेवेच्या माध्यमातून गावकऱ्यांना अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे.
स्मार्ट आणि इंटेलिजेंट गावांमध्ये काय काय होणार?
Ai तंत्राने सिंचन दिले जाणार. सेन्सर कळवेल किती पाणी द्यायचे आहे. त्यामुळे पाण्याची 30 टक्के बचत होईल. 2 टक्के खतांची बचत होईल.
शेतकऱ्यांना दूरवर असलेल्या शेती तज्ञांचे मार्गदर्शन डिजिटल पद्धतीने मिळेल..
पशु पालकांना डॉक्टर आणि तज्ञांचे मार्गदर्शन डिजिटली मिळेल..
स्मार्ट अंगणवाडी राहील..
ड्रोन ने खत फवारणी होऊन शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येणार नाही..
शेतकऱ्यांना मोबाईल ऍप द्वारे शेतावरील पंपाचे ऑपरेशन करता येईल..
विविध शासकीय योजनांचे लाभ, शासकीय दाखले हे आता गावकऱ्यांना डिजिटली संबंधित कार्यालयात न जाता मिळू शकतील.
आणखी वाचा