मुंबई: शेअर बाजारात पडझड कायम असून आजही सेन्सेक्समध्ये घसरण झाली आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 276 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 72 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 0.51 टक्क्यांची घसरण होऊन तो - 54,088 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.45 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,167 वर पोहोचला आहे. 

आज 787 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 2531 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 116 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 

बँक आणि रिअॅलिटी सेक्टरच्या शेअर्समध्ये 0.5 टक्क्यांची वाढ झाली तर आयटी, ऑटो, एफएमसीजी, फार्मा, उर्जा आणि कॅपिटल गुड्सच्या शेअर्समध्ये 0.5 ते 1 टक्क्यांपर्यंतची घसरण झाली.  BSE मिडकॅपमध्ये 0.4 टक्के तर स्मॉलकॅपमध्ये 2.2 टक्क्यांची घसरण झाली आहे. 

बुधवारी शेअर बाजारात Shree Cements, Bajaj Finserv, Larsen and Toubro, Bajaj Finance आणि NTPC या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून  ONGC, Axis Bank, IndusInd Bank, Cipla आणि HDFC या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.

या कंपन्यांचे शेअर्स वधारले

  • ONGC- 2.69  टक्के
  • Axis Bank- 1.91 टक्के
  • IndusInd Bank- 1.38 टक्के
  • Cipla- 1.24 टक्के
  • HDFC- 0.81 टक्के

या कंपन्यांचे शेअर्स घसरले

  • Shree Cements- 3.78 टक्के
  • Larsen- 2.31 टक्के
  • Bajaj Finserv- 2.20 टक्के
  • Bajaj Finance- 2.05 टक्के
  • NTPC- 1.87 टक्के

आज  शेअर बाजारात व्यवहाराला सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स वधारला होता. मात्र, त्यानंतर पु्न्हा घसरला. सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांकात 168.76 अंकानी घसरला. तर, निफ्टी निर्देशांकात  48.55 अंकाची घसरण दिसून आली. निफ्टी 16,194 अंकावर ट्रे़ड करत होता. प्री ओपनिंग सत्रात निफ्टीत किंचित घसरण दिसून आली. मात्र, सेन्सेक्समध्ये तेजी दिसून आली. आयटी, बँकिंग, मेटल आणि वित्तीय क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी दिसून आली होती.