Washim News : देशभरात आज (6 एप्रिल) श्री राम नवमीचा (Ram Navami 2025) उत्साह बघायला मिळत आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीच्या दर्शनासाठी वाशिमच्या दौऱ्यावर येणार होते. वाशिमच्या पोहरादेवीत रामनवमी निमित्त मोठ्या यात्रा महोत्सवाचे आयोजन केलं जातं. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील राम नवमी निमित्य पोहरादेवी इथं नतमस्तक होण्यासाठी येणार होत्या. मात्र पोहरादेवी येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा हा रद्द करण्यात आला असल्याची माहिती पुढे आली आहे. भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने दौरा रद्द
पुढे आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने हा दौरा रद्द झाल्याची माहिती पुढे आली आहे. यावेळी मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री संजय राठोड यांनी सपत्नीक संतसेवालाल महाराजांची शासकीय पूजन केलंय. तर मंत्री इंद्रनील नाईक हे देखील सपत्नीक यावेळी उपस्थीत होते. पोहरादेवीच्या इतिहासात प्रथम मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांनी अशा पद्धतीने शासकीय पूजन करण्यात आले आहे.
दरम्यान, यावेळी बोलताना एकनाथ खडसे यांनी केलेल्या आरोपावर गिरीश महाजनांना विचारले असता ते म्हणाले की, आज पोहरादेवी दर्शनासाठी आलो त्यांना निवांत उत्तर देईल. अस यावेळी महाजन यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. तर मुख्यमंत्री आज येऊ शकले नसले तरी ऑनलाईन पद्धतीने किंवा फोनद्वारे ते संवाद साधतील. या यात्रेला देश, विदेशातील बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येनं येत असतात आणि संत सेवालाल महाराज आणि जगदंबादेवीच्या चरणी नतमस्तक होत असतात. त्यामुळे सभेला मुख्यमंत्री संबोधित करतील, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
पोहरादेवीच्या इतिहासात प्रथम मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांकडून पूजन
दरम्यान, पोहरादेवी येथील सभास्थळी मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय राठोड, मंत्री इंद्रनील नाईक, मंत्री मेघना बोर्डीकर यांच आगमन झाले आहे. तसेच माजी मंत्री संजय कुटे,भाजप आमदार सईताई डहाके, भाजप विधान परिषद आमदार बाबूसिंग महाराज, यांची उपस्थिती ही बघायला मिळत आहे. पोहरादेवीच्या इतिहासात प्रथम मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांनी अशा पद्धतीने शासकीय पूजन करण्यात आले आहे.
हे ही वाचा