Chhatrapati Sambhajinagar: घरात घुसली, आतून कडी लावली; महिलेचा सासू सुनेला संपवण्याचा प्रयत्न, डोक्यावर पिस्तुल रोखलं अन्... घटनेनं संभाजीनगर हादरलं
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगर परिसरातील साई श्रद्धा पार्कमध्ये एका महिलेने दुसऱ्या महिलेची घरात घुसून हत्या केली.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar Crime News) बजाजनगर परिसरातील साई श्रद्धा पार्कमध्ये एका महिलेने दुसऱ्या महिलेची (Chhatrapati Sambhajinagar Crime News) घरात घुसून चाकू आणि पिस्तूलच्या साहाय्याने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. हल्ला अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आल्याने या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. (Chhatrapati Sambhajinagar Crime News)
Chhatrapati Sambhajinagar : शैलजाने घरात प्रवेश करताच आतून कडी.....
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शैलजा सोनार या सकाळच्या सुमारास साधना सोनपेठकर यांच्या घरी पोहोचल्या. त्या वेळी घरात साधना आणि त्यांची सासू उपस्थित होत्या. शैलजाने घरात प्रवेश करताच आतून कडी लावून घेतली आणि सोबत आणलेल्या पिस्तुलाने साधना यांच्या कपाळावर रोख धरला. मात्र, प्रसंगावधान राखत सासूबाईंनी धाडसाने पिस्तूल हिसकावून घेत ते खिडकीतून खाली फेकून दिले. या गोंधळात साधना या जीव वाचवण्यासाठी घरातील बेडरूममध्ये पळाल्या. (Chhatrapati Sambhajinagar Crime News)
Chhatrapati Sambhajinagar : सासूबाईंचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला...
यानंतर संतापलेल्या शैलजा सोनार यांनी सासूबाईंचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. सासूबाईंना वाचवण्यासाठी साधना पुन्हा हॉलमध्ये आल्या असता, शैलजाने त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात साधना सोनपेठकर यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने परिसरातील नागरिक हादरले. (Chhatrapati Sambhajinagar Crime News)
घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी महिलेला रंगेहात ताब्यात घेतले. झटापटीदरम्यान आरोपी शैलजा सोनार या किरकोळ जखमी झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तूल जप्त केले असून इतर पुरावेही गोळा करण्यात येत आहेत. दरम्यान, या हत्येमागील कारण म्हणून वैयक्तिक वाद समोर येत आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात मृत साधना सोनपेठकर यांचे पती महेंद्र सोनपेठकर आणि आरोपी शैलजा सोनार यांच्यात संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी शैलजाने महेंद्र सोनपेठकर यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हाही दाखल केला होता. या पार्श्वभूमीवर हा हल्ला सूडातून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपीकडून अधिक चौकशी करून नेमकी पार्श्वभूमी आणि हत्येचे कारण उघड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Chhatrapati Sambhajinagar : या थरारक घटनेचा घटनाक्रम आला समोर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत साधना सोनपेठकर यांचे पती महेंद्र सोनपेठकर यांचे आणि खून करणारी महिला शैलजा सोनार यांचे संबंध होते. यापूर्वी शैलजा यांनी महेंद्र यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा ही पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. अचानक सकाळी शैलजा सोनार या महेंद्र सोनपेठकर यांच्या घरी पोहोचल्या .घरी सासू आणि साधना सोनपेठकर या दोन्ही उपस्थित होत्या.. शैलजाने घराची कडी आतून लावून घेतली. सुरुवातीला सोबत आणलेली बंदूक साधना यांच्या कपाळावर ठेवली. तेवढ्यात सासूबाईंनी ती बंदूक हिसकावली आणि खिडकीतून खाली फेकून दिली. तोवर साधना आतल्या बेडरूममध्ये पळाल्या. तेवढ्यात शैलजाना सासूबाईंचा गळा आवळायला सुरुवात केली. सासूबाईंना वाचवण्यासाठी साधना परत हॉलमध्ये आल्या आणि थेट शैलजांनी साधनावर चाकून सभासपवार केले जात साधना सोनपेठ कर यांचा जागीच मृत्यू झाला.






















