Siddhant Shirsat: राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री व छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट(Siddhant Shirsat) यांचे सुपुत्र सिद्धांत संजय शिरसाट (Siddhant Shirsat) यांच्यावरती एका विवाहित महिलेने गंभीर आरोप केले आहेत. सिद्धांत शिरसाट (Siddhant Shirsat) यांनी आपली फसवणूक केली असून त्यांच्याविरुद्ध मानसिक आणि शारीरिक छळ, फसवणूक, धमकी , हुंडा प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. याबाबत महिलेने सिद्धांत शिरसाट(Siddhant Shirsat) यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.  

Continues below advertisement

नेमकं प्रकरण काय?

महिलेने या फ्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, विवाहित महिलेची ओळख सिद्धांत शिरसाट यांच्याशी 2018 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये संबंध निर्माण झाले आणि चेंबूर येथील एका फ्लॅटवर त्यांच्या प्रत्यक्ष भेटी, तसेच शारीरिक संबंध झाले होते. सिद्धांत शिरसाट यांनी वारंवार आत्महत्येची धमकी देऊन ब्लॅकमेल करत तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकला आणि सिद्धांत शिरसाट यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून लग्न केल्याचा आरोपही महिलेने केला आहे.

सिद्धांत शिरसाट यांच्यासोबत 14 जानेवारी 2022 रोजी बौद्ध पद्धतीने लग्नही केल्याचा दावा संबंधित महिलेने केला आहे. इतकंच नाही तर त्याबाबत आपल्याकडे पुरावेही आहेत. एवढ्यावरच न थांबता, या संबंधातून महिलेला गर्भधारणाही झाली, मात्र सिद्धांत यांनी जबरदस्तीने गर्भपात करवून घेतल्याचा आरोपही महिलेने नोटीसमध्ये केला आहे.

Continues below advertisement

महिलेचे आरोप काय?

महिलेचा सिद्धांत  शिरसाट यांच्यावरती आरोप करताना म्हटलं आहे की, लग्नानंतर सिद्धांत यांच्या वागणुकीत बदल झाला. त्यांनी चेंबूरमधील फ्लॅटमध्येच राहण्यास सांगून छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन जाण्यास नकार दिला. त्यांचे आधीचे विवाह संबंध, तसेच इतर महिलांसोबत असलेले संबंध उघडकीस आल्यावर त्यांनी धमक्या देण्यास सुरुवात केली. “जर तू पोलिसांकडे गेलीस तर मी आत्महत्या करीन आणि तुझे संपूर्ण कुटुंब उध्वस्त करीन” अशा स्वरूपाच्या धमक्याही त्यांनी दिल्याचे आरोप केले आहेत.

20 डिसेंबर 2024 रोजी शाहूनगर पोलिस स्टेशनमध्ये संबंधित महिलेने तक्रार दाखल केली होती. मात्र सिद्धांत शिरसाट यांचे वडील संजय शिरसाट हे मंत्री असल्यामुळे पोलीसांनी याबाबत कारवाई न करता प्रकरण दाबल्याचा आरोपही कायदेशीर नोटीसमध्ये करण्यात आला आहे. महिलेच्या वकिलांनी सात दिवसांच्या आत सिद्धांत शिरसाट यांनी तिला नांदविण्यासाठी घरी घेऊन यावे आणि न्याय द्यावा, अन्यथा महिला अत्याचार प्रतिबंधक कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा आणि फसवणूक यांसारख्या विविध कलमांनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असं म्हटलं आहे. ॲड. चंद्रकांत ठोंबरे यांच्या मार्फत कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.

सिद्धांत शिरसाट यांनी फोन करू नकोस, नाहीतर मी तुझे सर्व कुटूंब गुंडाकडून खत्म करीन. माझे वडील मंत्री होणार आहेत आणि ते मुख्यमंत्री शिंदे याचे उजवे हात आहेत, असंही म्हटल्याचं समोर आलं आहे. 

मंत्री संजय शिरसाट यांच्यावरही नोटीसमध्ये आरोप

या विवाहित महिलेने  दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी पोलीस स्टेशन शाहूनगर, मुंबई येथे तकार केली होती. मात्र, संजय शिरसाठ हे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री झाल्यामुळे त्यांनी पोलीसावर दबाव टाकल्यामुळे कारवाई करू दिली नाही असा आरोपही या महिलेने संजय शिरसाट यांच्यावरती केले आहेत.