Samruddhi Highway Accident:  समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway Accident) कारचे टायर पंक्चर झाल्याने कार बाजूला घेणाऱ्या दोन जणांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना समृद्धी महामार्गावर जयपूर शिवारात घडली आहे(Samruddhi Highway Accident) . या अपघातात कार चालक योगेश दत्तात्रय घाटेकर (३८, केळगाव, ता. निफाड, जि. नाशिक) व शेतकरी देविदास नाना मते (६०, रा. जयपूर, ता. छत्रपती संभाजीनगर) या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर बाळू विश्वनाथ घाटेकर (६०, राकेळगाव, ता. निफाड, जि. नाशिक) हे गंभीर जखमी झाले. (Samruddhi Highway Accident) 

Continues below advertisement

योगेश दत्तात्रेय घाटेकर हे कारने समृद्धी महामार्गाने निफाडहून रेशीम विक्रीसाठी जालना येथे जात होते. प्रवासादरम्यान त्यांची कार समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway Accident) जयपूर शिवारात पंक्चर झाल्याने त्यांनी ती महामार्गाच्या बाजूला उभी केली. या वेळी त्यांनी मार्गालगत असलेल्या शेतात काम करीत असलेले शेतकरी देविदास मते हे त्यांच्या मदतीसाठी धावले. ते तिघे कारच्या बाजूला उभे असताना याच दरम्यान छत्रपती संभाजीनगरकडून येणाऱ्या भरधाव आयशरने तिघांना जोराची धडक दिली. या अपघातात कार चालक घाटेकर आणि मदतीला आलेले शेतकरी मते हे दोघे जागीच ठार झाले. तर गाडीत सोबत असलेले बाळू घाटेकर हे गंभीर जखमी झाले.(Samruddhi Highway Accident) 

Samruddhi Highway Accident: मदत करायला गेलेल्या शेतकऱ्याचाही मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गाशेजारी शेती असलेल्या शेतकऱ्याला समृद्धी महामार्गावर कारचे चाक पंक्चर झाल्याचं दिसलं. त्यांना मदत करायला गेलेल्या शेतकऱ्याला व कार चालकाला भरधाव वाहनानं उडवल्यानं दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास जयपूर शिवारातील महामार्ग क्र. ४०२ वर घडली. 

Continues below advertisement

Samruddhi Highway Accident: कोळेगाव येथून रेशीम विक्रीसाठी जालन्याला निघालेले...

कार बाजूला उभी करून चालक दुरुस्ती करत असताना शेतकरी देविदास मते मदतीसाठी आले. त्याच दरम्यान, छत्रपती संभाजीनगरकडून येणाऱ्या भरधाव आयशर ट्रकने उभ्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला, तर चारचाकीमध्ये असलेले बाळू विश्वनाथ घाटेकर (वय ६०) हे गंभीर जखमी झाले. कोळेगाव येथून रेशीम विक्रीसाठी जालन्याला निघालेली ही कार पंक्चर झाल्याने हा अपघात झाला. या अपघातामध्ये निस्वार्थ भावनेने मदतीसाठी गेलेल्या एका निरपराध शेतकऱ्याचा जीव गेल्याने जयपूर करमाड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मते यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, ३ मुली, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे.