Samruddhi Mahamarg Thane Shahapur accident : छत्रपती संभाजीनगरच्या  समृद्धी महामार्गावर  मोठा अपघात झाला आहे. अपघातात  बारा जणांचा मृत्यू झाला आहे. यात 6 वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत व्यक्त करत दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तसेच या  घटनेतील मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली केली आहे


नरेंद्र मोदींनी ट्विट करुन संभाजीनगरच्या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. अपघाताच्या वृत्ताने अतिशय दु:ख झाले असून मृतांच्या कुटुंबीयांबद्दल मी सहवेदना व्यक्त करतो. तसेच, जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना. प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून मदत व बचावकार्य सुरू असल्याचेही मोदींनी ट्विटमध्ये म्हटले. तर, मृतांच्या वारसांना पंतप्रधान फंडातून दोन लाख तर जखमींना 50  हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.






देवेंद्र फडणीवासांनी ट्वीट करत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच मृतकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याच्या तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सूचना फडणवीसांनी दिल्या आहेत.






कसा झाला अपघात?


छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावर आल्यावर बसच्या पुढे एक ट्रक चालत होता. मात्र, जांबरगाव टोलनाक्याच्याजवळ ट्रकला अचानकपणे एका आरटीओच्या पथकाने हात दाखवत थांबण्याचा इशारा केला आणि ट्रक चालकाने जागेवरच ब्रेक मारला. त्यामुळे मागून येणाऱ्या ट्रॅव्हल्स बस चालकाला काही कळण्याच्या आता धरधाव वेगाने येणारी ट्रॅव्हल्स बस ट्रकवर जाऊन धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रॅव्हल्स बसच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे.