एक्स्प्लोर

chhatrapati sambhajinagar Crime: लग्नाला नकार देताच गळ्यावरून चाकू फिरवला; प्रियकराला दारू पाजून मित्र, भावाच्या मदतीने काढला काटा, 13 दिवसांनंतर 14 किलोमीटरवर मृतदेह वाहून आला..

chhatrapati sambhajinagar Crime: पैठणला गोदावरी नदीत त्याचा मृतदेह फेकला. वाहत गेलेला हा मृतदेह मुंगी गावात येथे तरंगत काठावर आला. त्यानंतर या खुनाला वाचा फुटली.

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहराच्या हर्सूलमधून 31 जुलैला बेपत्ता झालेल्या छावा संघनटनेचा शहर प्रमुख सचिन पुंडलिक औताडे यांचा प्रेम प्रकरणातून गळा चिरून खून झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कॅनॉट भागात त्यांच्या प्रेयसीने तिच्या मामेभावाच्या मदतीने सचिन यांचा काटा काढला. पैठणला गोदावरी नदीत त्याचा मृतदेह फेकला. वाहत गेलेला हा मृतदेह मुंगी गावात येथे तरंगत काठावर आला. त्यानंतर या खुनाला वाचा फुटली. अहिल्यानगर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवित चार दिवसांत 2 आरोपींना बेड्या ठोकल्या. अद्याप एक आरोपी पसार आहे. दुर्गेश मदन तिवारी, भारती रवींद्र दुबे छावा संघटनेची महिला प्रदेशाध्यक्ष अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. अफरोज खान हा पसार आहे.

लग्न करण्यास नकार दिल्याने काढला काटा

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी भारती दुबे ही स्थानिक छावा संघटनेची महिला पदाधिकारी आहे. सचिन औताडे त्याच संघटनेत काम करीत होते. ते दोघेही विवाहित आहेत. मात्र, भारतीने फारकत घेतली होती. सचिन आणि भारतीचे प्रेमसंबंध होते. भारतीने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला होता. ते विवाहित असल्याने ते नकार देत होते. भारती पतीपासून वेगळी झाली असून, एकटी कॅनॉट प्लेसमध्ये राहत होती. भाऊ असल्याचा दावा करणारा दुर्गेश फार्मसीचे शिक्षण घेऊन एका औषधी कंपनीत नोकरीला आहे.तर फरार असलेला आरोपी अफरोज वाहन खरेदी-विक्री एजंट आहे. भारती व सचिन चार वर्षापासून एका संघटनेत काम करत होते. ती राज्य महिला प्रदेशाध्यक्ष असून, सचिन शहराध्यक्ष होते. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. 31 जुलै रोजी दोघांनी दारू खरेदी केली. कॅनॉट प्लेसच्या फ्लॅटवर मामेभाऊ दुर्गेशही सहभागी झाला. भारतीने मध्यरात्री अफरोजलादेखील बोलावून घेतले. तेव्हा त्यांच्यात वाद झाले. तिघांनी बेदम मारहाण करत सचिनवर चाकूने वार करत जिवे मारल्याची माहिती समोर आली आहे.

दोन टॅटूवरून ओळख

कुटुंब बेपत्ता असलेल्या सचिन यांचा शोध घेत असताना 13 ऑगस्ट रोजी शेवगावलगत मुंगी येथील गोदापात्रात सचिन यांचा मृतदेह आढळून आला. मानेच्या उजव्या बाजूस भक्त्ती, तर हातावर सचिन नाव गोंदलेले होते. यामुळे त्यांची ओळख पटली. शरीरावर गंभीर वार असल्यामुळे ही हत्याच असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी प्रकरणाचा तपास केल्यानंतर घटना उघडकीस आली. 

13 दिवसांनंतर 14 किलोमीटरवर मृतदेह वाहून आला

सचिन यांच्या मित्रांच्या चौकशीत भारतीचा उल्लेख झाला, त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. 31 जुलैपासून भारती राहत असलेल्या फ्लॅटवर परतली नसल्याचे कळताच पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही तपासले. रात्री दीडला तिघेही प्लास्टिकमध्ये मृतदेह घेऊन जाताना दिसले. पैठणच्या पुलावरून त्यांनी मृतदेह गोदावरीत फेकला. 13 दिवसांनंतर मृतदेह 14 किलोमीटरवर वाहत जाऊन मुंगी गावातील पात्रापर्यंत वाहत गेला.

80 पेक्षा जास्त फुटेज आणि एक फोन नंबर

अहिल्यानगर गुन्हे शाखेने भारतीचा शोध सुरू केला. भारतीचे सर्व मोबाइल बंद होते. 1 ऑगस्ट रोजी दोघांना साखरखेर्डात सोडून अफरोज पसार झाला. चार दिवसांपूर्वी तो चिकलठाण्याच्या वाहन बाजारात गेल्याचे समजताच पोलिस पथकाने त्याठिकाणी धाव घेतली. मात्र, तो सापडला नाही. पथकाने 80 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याच दरम्यान भारतीने एका मित्राला कॉल केला. त्या एका क्रमांकावरून पोलिसांनी साखरखेर्ध्यात नातेवाइकाच्या शेतातून भारतीला ताब्यात घेतलं.

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray: मुख्यमंत्र्यांच्या वाॅररुमध्ये सीएम आणि डीसीएममध्ये वाॅर सुरुय, समृद्धीवर दरोडे पडताहेत; आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
मुख्यमंत्र्यांच्या वाॅररुमध्ये सीएम आणि डीसीएममध्ये वाॅर सुरुय, समृद्धीवर दरोडे पडताहेत; आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 5 वा दिवस; विखे-पाटील-सामंतांची पत्रकार परिषदेतून माहिती, म्हणाले आम्ही मसुदा दिलाय
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 5 वा दिवस; विखे-पाटील-सामंतांची पत्रकार परिषदेतून माहिती, म्हणाले आम्ही मसुदा दिलाय
Vinod Patil and Manoj Jarange patil: मनोज जरांगेंना मित्र-भाऊ म्हणून आवाहन, यापुढे चांगली भाषा वापरा, विनोद पाटील नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगेंना मित्र-भाऊ म्हणून आवाहन, यापुढे चांगली भाषा वापरा, विनोद पाटील नेमकं काय म्हणाले?
Chhatrapati Sambhajinagar Crime News: मामेभावांनीच ठेचले आतेभावाचे डोके; जुन्या आर्थिक वादाचा रक्तरंजित शेवट, छत्रपती संभाजीनगरमधील थरारक घटना
मामेभावांनीच ठेचले आतेभावाचे डोके; जुन्या आर्थिक वादाचा रक्तरंजित शेवट, छत्रपती संभाजीनगरमधील थरारक घटना

व्हिडीओ

Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT
Manoj Jarange Jalna : प्रसाद लाड यांच्याकडून पाणी प्यायले, पण मनोज जरांगे उपोषणावर ठाम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 Chhatrapati Sambhajinagar Fire News : मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग; 9 चिमुकल्यांसह 58 रुग्ण थोडक्यात बचावले
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न, 9 चिमुकल्यांसह 58 रुग्ण थोडक्यात बचावले
Vidyanand Bapat : विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? रत्नागिरीतून आई वडिलांचा विद्यानंद बापट यांना भावनिक फोन
विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? आई वडिलांचा भावनिक फोन
Goa : गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार, भाजप सरकारची मोठी घोषणा 
गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार
Smriti Mandhana: स्मृती मंधानाचा डबल धमाका! आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडित काढला, शतकांमध्येही विश्वविक्रम
स्मृती मंधानाचा डबल धमाका! आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडित काढला, शतकांमध्येही विश्वविक्रम
Rohit Sharma : रोहित शर्माच्या रिटायरमेंटच्या दिवसभर चर्चा, अखेर बीसीसीआयचे सचिव मैदानात, हिटमॅनच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज
रोहित शर्माच्या रिटायरमेंटवरुन तर्क वितर्क, अखेर BCCI चे सचिव समोर आले अन् सगळं स्पष्ट केलं
सातारा, कोल्हापूरचा जीआर काढा, प्रमाणपत्र काढताना वंशावळ ग्राह्य धरली जात नाही, मंत्रालयामध्ये कधी मराठा-कुणबी स्वतंत्र कक्षाची स्थापना करणार? जरांगे पाटलांची सरकारच्या शिष्टमंडळासमोर प्रश्नांची सरबत्ती
सातारा, कोल्हापूरचा जीआर काढा, प्रमाणपत्र काढताना वंशावळ ग्राह्य धरली जात नाही, मंत्रालयामध्ये कधी मराठा-कुणबी स्वतंत्र कक्षाची स्थापना करणार? जरांगे पाटलांची सरकारच्या शिष्टमंडळासमोर प्रश्नांची सरबत्ती
BCCI : अखेर युवा खेळाडूचा फसवाफसवीचा खेळ संपला, बीसीसीआयनं थेट दोन वर्षाची बंदी घातली  
युवा खेळाडूचा फसवाफसवीचा खेळ संपला, बीसीसीआयनं थेट दोन वर्षाची बंदी घातली
Permanently Shifted! SIR मधून चक्क भाजप खासदार राघव चड्ढांचं नाव वगळलं; पंजाब सरकारवर गंभीर आरोप करत म्हणाले, 'जेव्हापासून मी आप सोडला तेव्हापासून..' आपचा सुद्धा पलटवार
Permanently Shifted! SIR मधून चक्क भाजप खासदार राघव चड्ढांचं नाव वगळलं; पंजाब सरकारवर गंभीर आरोप करत म्हणाले, 'जेव्हापासून मी आप सोडला तेव्हापासून..' आपचा सुद्धा पलटवार
Embed widget