Sanjay Shirsat : छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhajinagar City) बुधवारी मध्यरात्री दोन गट आमने-सामने आल्याने वाद निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांच्या गाड्यांसह इतर खाजगी वाहनांना पेटवून देण्यात आल्या होत्या. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे दाखल केले आहे. तर आता यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील येत असून, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. 'छत्रपती संभाजीनगर शहरात घडलेली घटना पूर्वनियोजित असून, याबाबत आपण पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आढावा घेणार असल्याचे शिरसाट म्हणाले आहे. 


छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या वादावर बोलताना शिरसाट म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर शहरात काल झालेला राडा हा पूर्वनियोजित असल्याचा दावा आमदार संजय शिरसाट यांनी केलाय. यावेळी संजय शिरसाट यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. तर अचानक 400-500 तरुण एकाच वेळी तोंडाला रुमाल बांधून कसे काय येऊ शकतात. तसेच हे सर्व 10 मिनिटांत कसे काय होणे शक्य आहे? असा प्रश्न देखील आमदार संजय शिरसाट यांनी उपस्थित केले आहेत. 


तर यावेळी शिरसाट यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जर खासदार सांगतात बटन गॅंग यामागे आहे, तर ती बटन गॅंग कोण आहे?  हे खासदारांनी पोलिसांना सांगितले पाहिजे. तसेच या सर्व प्रकरणाबाबत मी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन सर्व आढावा घेणार असल्याचेही शिरसाट यांनी सांगितलं. 


सरकार याविषयी गंभीर


दरम्यान पुढे बोलताना शिरसाट म्हणाले की, रामनवमीच्याच पार्श्वभूमीवर हा सर्व प्रकार मुद्दाम घडवण्यात आल्याचा आरोप संजय शिरसाठ यांनी केला आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकार याविषयी गंभीर असून मी कालच गृहमंत्र्यांची भेट घेतली असल्याचं शिरसाट म्हणाले आहेत. 


राजकीय आरोप-प्रत्यारोप...


छत्रपती संभाजीनगर शहरात बुधवारी झालेल्या वादानंतर परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र यावरूनच आता राजकीय वातावरण मात्र पेटलं आहे. कारण सत्ताधारी आणि विरोधक यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे. या सर्व घटनेसाठी एकमेकांना जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर महाविकास आघाडीची सभा शहरात होणार असल्याने जाणीवपूर्वक अशा घटना घडवल्या जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर अशा परिस्थितीत राजकीय नेत्यांनी वक्तव्य करताना काळजी घेण्याची गरज असल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे. 


इतर महत्वाचे बातम्या : 


छ. संभाजीनगरातील वादानंतर असा आहे शहरात पोलीस बंदोबस्त; रॅपिड अॅक्शन फोर्सही तैनात