Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) बुधवारी दोन गटात झालेल्या वादानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान आज शहरापासून जवळच असलेल्या ओहर गावात (Ohar Village) देखील गटात वाद झाल्याचे पाहायला मिळाले. रात्री झालेल्या वादानंतर आज सकाळी या गावात दगडफेकीची घटना घडली आहे. यात सहा जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी तत्काळ गावात धाव परिस्थिती नियंत्रणात आणली असून, गावात सर्वत्र सध्या शांतता पाहायला मिळत आहे. तर खबरदारी म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ओहर तैनात करण्यात आला आहे.
बुधवारी छत्रपती संभाजीनगर शहरात मध्यरात्री दोन गटात वाद झाला. त्यानंतर या परिसरात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून, शहरात शांतता पाहायला मिळत आहे. असे असताना गुरुवारी छत्रपती संभाजीनगर शहरापासून 12 किलोमीटर असलेल्या ओहर गावात देखील रात्री राम नवमीच्या मिरवणुकीदरम्यान दोन गटात वाद झाला होता. रात्री झालेला वाद त्यावेळी मिटवला गेला. पण सकाळी पुन्हा दोन गटात दगडफेक झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या या गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून, गावात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे.
पोलिसांची प्रतिक्रिया...
ओहर गावात झालेल्या वादावर प्रतिक्रिया देताना पोलिसांनी म्हटले आहे की, ओहर गावात झालेल्या वादात दोन्ही गटातील दोन-दोन लोकं जखमी झाले आहेत. त्यांना शासकीय घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. सध्या गावात शांतता असून, कायदेशीर कारवाई करण्याची प्रकिया सुरु आहे.
गावात सध्या शांतता...
गुरुवारी रात्री दोन गटात झालेल्या वादावरून आज सकाळी ओहर गावात दगडफेक झाली. यात काही गावकरी जखमी देखील झाले आहेत. मात्र पोलिसांनी वेळीच गावात धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. सध्या गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, गावात शांतता आहे. तसेच गावकरी नेहमीप्रमाणे आपले कामे करताना पाहायला मिळत आहे. तर पोलिसांनी देखील गावकऱ्यांना शांतता कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे. सोबतच वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील गावात तळ ठोकून असल्याचे पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :