Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) कन्नड तालुक्यात दोन गटात राडा होऊन काही तास उलटत नाही तो आता पुन्हा एकदा जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन गावात पुन्हा दोन गटात वाद झाला आहे. दरम्यान यावेळी करण्यात आलेल्या हल्ल्यात लाठ्या, काठ्या आणि हॉकी स्टिकने मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादित म्हटले आहे. ज्यात एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. तर या प्रकरणी संदीप बबन धर्मे (वय 29 वर्ष, रा. बिडकीन ता. पैठण) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एकूण पाच लोकांवर बिडकीन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


संदिप बबन धर्मे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारी जबाब म्हटले आहे की, बिडकीन गावातील शेकटा रोडवर राहणारा मंगेश जगदाळे यास मी ओळखतो व आमच्यात काही दिवसांपुर्वी वाद झालेला होता. दरम्यान बुधवारी (31 मे) रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास संदीप धर्मे हे त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तिला सोडण्यासाठी आपल्या दुचाकीवरून शेकटा रोडने जात होते. तेव्हा तेथे मंगेश जगदाळे हा हातात काठी घेवुन त्याचे हॉटेल समोर उभा होता व त्याने धर्मे यांना आवाज देवुन थांबविले. तसेच जुन्या भांडणाचे कारनावरुन शिवीगाळ करण्यास सुरवात केली. 


मंगेश जगदाळे शिवीगाळ करत असतानाच सचिन रामनाथ जगदाळे, आकाश रामनाथ जगदाळे, विजय रोकडे आणि अमन वामन साठे हातात लाठ्या काठ्या घेवुन आले. ज्यात अमन साठेच्या हातात हॉकी स्टीक होती. त्यांनी सर्वांनी मिळुन धर्मे यांना शिवीगाळ करुन पाठीवर, छातीवर लाठ्या काठ्याने मारहाण करुन मुक्का मार दिला. तर अमन साठे याने त्याच्या हातातील हॉकी स्टीकने धर्मे यांच्या डोक्यात मारुन जखमी केले. तसेच लाथाबुक्याने देखील मारहाण केली. दरम्यान भांडणाचा आवाज ऐकुण बाजुला राहणाre संदीप धर्मे यांचे चुलत भाऊ मच्छिंद्र धर्मे हा तेथे आला. त्याने व सोबत असलेला संभाजी शिंदे यानी संदीप यांची आरोपींच्या तावडीतुन सुटका केली, असल्याचे तक्रारीत म्हटले आहेत. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. 


घाटीत मोठा जमाव... 


बिडकीन येथील शेकटा रोडवर जुन्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. त्यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमाव पांगवला. तसेच जखमींना बिडकीन येथील शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान यावेळी रुग्णालयाच्या परिसरात देखील मोठा जमाव जमा झाला होता. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करत जमाव पांगवून लावला आहे. शुल्लक कारणावरून झालेला  वाद होता आणि सद्या सर्वत्र शांतता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा दोन गटात राडा; पोलिसांकडून अफवा न पसरवण्याचे आवाहन