Chhatrapati Sambhaji Nagar News: आज देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते. दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) देखील आज असाच उत्साह असणार आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छत्रपती संभाजीनगर शहरासोबत वेगळं नातं होते. विशेष म्हणजे बाबासाहेबांनी काही दिवस या शहरात घालवले असून, त्यांच्या अनेक आठवणी या शहरासोबत जोडलेल्या आहेत.  त्यामुळे 14 एप्रिलला छत्रपती संभाजीनगर शहरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे दिवसभर आयोजन करण्यात येत असते. तर शहरातील क्रांती चौकातून मुख्य मिरवणुका निघतात. दरम्यान काही दिवसांपूर्वी शहरात रामनवमीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या हिंसाचाराची घटना लक्षात घेता पोलिसांकडून आज मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


असा असणार पोलिसांचा बंदोबस्त...



  • पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती अपर्णा गीते (पोलीस उपायुक्त मुख्यालय)  दिपक गिऱ्हे (पोलीस उपायुक्त झोन-1) शीलवंत नांदेडकर (पोलीस उपायुक्त झोन-2 )

  • शहरातील 4  सहायक पोलीस उपायुक्त

  • एकूण 27 पोलीस निरीक्षक आणि 87 सहाय्यक पोलीस निरीक्षक/ पोलीस उपनिरीक्षक

  • एकूण 1295  पोलीस अंमलदार तसेच 123 महिला अंमलदार

  • शहरातील सर्व मुख्य मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठ 19  व्हिडिओ ग्राफर

  • याव्यतिरिक्त विशेष शाखा आणि गुन्हे शाखा यांचा साध्या गणवेशातील बंदोबस्त नेमलेला आहे

  • शहरातील संवेदनशील ठिकाणी 81 फिक्स पॉईंट

  • घातपात विरोधी तपासणीसाठी विशेष पथक

  • बारा ठिकाणी एस.आर.पी.एफच्या स्पेशल पथकाचा बंदोबस्त

  • बारा स्ट्रायकिंग फोर्स, वरिष्ठ अधिकारीसोबत व नियंत्रण कक्ष इथे राखीव राहतील

  • कमांड कंट्रोल सेंटर येथे पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी यांच्यामार्फत संपूर्ण शहरावर विशेष निगराणी ठेवतील

  • एकूण 191 मिरवणुकीत सहभागी मंडळासोबत एक विशेष पोलीस अंमलदार मिरवणूक सुरूवात ते संपेपर्यंत नेमण्यात आलेला आहे.

  • याव्यतिरिक्त शहरभर पोलीस स्टेशनच्या पीटर मोबाईल,सेकंड मोबाईल, पीसीआर 112 बीट मार्शल, यांच्यामार्फत विशेषगस्त राहणार आहे.

  • मिरवणुकीमधील महिला व मुलींची छेडछाड होऊ नये यासाठी छेडछाड विरोधी पथक, दामिनी पथक नेमण्यात आलेले आहे.

  • हरवले आणि पळवलेल्या मुलं आणि व्यक्तींच्या शोध मोहिमेसाठी विशेष पथकही नेमण्यात आलेले आहे

  • मिरवणुकीच्या महत्त्वाच्या ठिकाणी वॉच टॉवर वर पोलिसांना नेमुन त्यांच्या मार्फत दुर्बिणीद्वारे मिरवणुकीवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या : 


आंबेडकर जयंती! छत्रपती संभाजीनगर शहरातील वाहतुकीत बदल; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन