छत्रपती संभाजीनगर : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) पॉवर ग्रिड ट्रान्समीमिशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतुक तीन दिवस बंद राहणार आहे. मंगळवार (31 ऑक्टोबर), बुधवार (1 नोव्हेंबर) व गुरुवार (2 नोव्हेंबर) असे तीन दिवस दुपारी 12 ते साडेतीन यावेळात जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतुक बंद असेल. उर्वरित कालावधीत वाहतुक सुरळीत सुरु राहील. बंद कालावधीत पर्यायी मार्गावरुन वाहतुक वळविण्यात आली आहे,असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता व प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी कळविले आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. हे काम 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर असे तीन दिवस सुरु राहणार आहे. दुपारी 12 ते साडेतीन यावेळात हे काम चालणार आहे. त्यामुळे या काळात तुम्ही छत्रपती संभाजीनगर ते जालना दरम्यान समृद्धी महामार्गावरून प्रवास करणार असाल तर तुम्हाला पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
पर्यायी मार्ग...
- जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान समृद्धी महामार्गावरील जालना इंटरचेंज ते सावंगी इंटरचेंज दरम्यान नागपूरकडून मुंबईकडे जाणारी वाहतुक, निधोना (जालना) इंटरचेंजमधून बाहेर पडून निधोना एमआयडीसी मार्गे- राष्ट्रीय महामार्ग जालना-छत्रपती संभाजीनगर मार्गे केंब्रीज शाळेपर्यंत नंतर ती उजवीकडे वळून सावंगी बायपास मार्गे सावंगी इंटरचेंज (छत्रपती संभाजीनगर) येथे समृद्धी महामार्गावर प्रवेश करुन शिर्डीकडे रवाना होईल.
- तर समृद्धी महामार्गावरील शिर्डीकडून नागपूरकडे जाणारी वाहतूक, सावंगी इंटरचेंज (छत्रपती संभाजीनगर) येथून बाहेर पडून वर नमूद केलेल्या मार्गावरुन (विरुद्ध दिशेने) निधोना (जालना) इंटरचेंज या ठिकाणी समृद्धी महामार्गावर प्रवेश करुन नागपूरकडे रवाना होईल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता व प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी कळविले आहे. उर्वरीत कालावधीत वाहतुक सुरळीत सुरु राहिल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
यापूर्वी कामाला दिली होती स्थगिती...
यापूर्वी देखील पहिला टप्पा 10 ते 12 ऑक्टोबर व दुसरा टप्पा 25 व 26 ऑक्टोबर या कालावधीत जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समीमिशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नियोजित पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम पुढे स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा हे काम हाती घेण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: