छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातील कोट्यवधींची जमीन सालारजंग कुटुंबांनी हिबानामा म्हणून दिलेल्या जमिनीच्या चौकशीसाठी संदीपान भुमरे (MP Sandipan Bhumre) यांचा ड्रायव्हर जावेद शेख याला आयकर विभागाने नोटीस बजावून चौकशी बोलावले होते. ती नोटिस एबीपी माझाच्या हाती आली आहे, 8 जुलै रोजी आयकर विभागाने चौकशीसाठी बोलावले होते, मात्र ते चौकशीसाठी हजर राहिले की नाही याबाबत माहिती समोर आली नाही. मिळालेल्या माहितीनुसार चौकशीसाठी हजर राहण्याकरिता आणखी वेळ मागितल्याची माहिती समोर आली आहे.

Continues below advertisement


जावेद शेखला आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. ही नोटीस एबीपी माझाच्या हाती लागलेली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील कोट्यवधींची जमीन सालार गंज कुटुंबाने हिबानामा म्हणून जावेद शेख यांना दिली. या जमिनीच्या चौकशीसाठी संदिपान भुमरे यांचा ड्रायव्हर जावेद शेखला आयकर विभागाने नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावले होते. आठ जुलैला आयकर विभागाने चौकशीसाठी बोलावले मात्र तो चौकशीसाठी हजर राहिला नाही अशी माहिती समोर येत आहे. चौकशीला हजर राहण्यासाठी त्यांनी आणखी वेळ मागितल्याची चर्चा आहे. 


बातमी अपडेट होत आहे...