Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी ईडीकडून (ED) छापेमारी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका धान्य व्यापाऱ्याची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. राजस्थान मध्यान भोजन योजनेला या व्यापाऱ्याने धान्य पुरवल्याचे बोलले जात असून, त्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ईडीच्या पथकाने सकाळीच ही छापेमारी सुरु केली होती. त्यामुळे या कारवाई शहरात खळबळ उडाली आहे. मात्र, या कारवाईबाबत अजूनही कोणतेही अधिकृत माहिती ईडीकडून देण्यात आलेली नाही.
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगर शहरात 'ईडी'ची छापेमारी; सकाळपासून कारवाई सुरु
डॉ. कृष्णा केंडे | मोसीन शेख | 26 Sep 2023 03:51 PM (IST)
ED raid in Chhatrapati Sambhajinagar : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका धान्य व्यापाऱ्याची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे.
ED raid in Chhatrapati Sambhajinagar city