Abhijeet Dipke : कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजित दीपके आज भारतात परतले आहेत. दीपके यांनी ६ जून रोजी नवी दिल्ली येथे जाहीर केलेल्या निषेध मोर्चाच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या मूळ निवासस्थानी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता, दरम्यान जनक्षोभाच्या आणि सार्वजनिक आकर्षणाच्या भीतीने दीपके यांच्या कुटुंबियांने खबरदारीचा (Cockroach Janta Party Abhijeet Dipke) उपाय म्हणून आपले घर सोडून तात्पुरत्या स्वरूपात (Cockroach Janta Party Abhijeet Dipke) दुसरीकडे स्थलांतर केले असल्याचे समोर आले आहे. बोस्टन (अमेरिका) येथे कार्यरत असलेले सोशल मीडियावरील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असलेले अभिजित दीपके हे भारतात दाखल झाले आहेत, तर त्यांच्या नियोजित आंदोलनामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.(Cockroach Janta Party Abhijeet Dipke)कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक, अभिजीत दीपके आणि त्यांचे सहकारी दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्ली पोलिसांनी विमानतळाच्या टर्मिनल तीन वर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
अभिजित यांचे वडील भगवानराव दीपके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, हे स्थलांतर कोणत्याही थेट धमकीमुळे करण्यात आलेले नसून, केवळ वाढत्या जनक्षोभाचा आणि प्रसिद्धीचा विचार करून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घेतलेला हा एक कौटुंबिक निर्णय आहे. सुरुवातीला आपण मुलाला या आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याच्या दृढ निर्णयापुढं शेवटी आपला नकार मागे घ्यावा लागला, अशी कबुलीही त्यांनी दिली. सोशल मीडियाच्या माध्यमातून उपरोधिक राजकीय भाष्य आणि सार्वजनिक धोरणांवर सडकून टीका करून अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या ३० वर्षीय अभिजित दीपके यांच्या या आंदोलनाची देशभरात चर्चा सुरू आहे.(Cockroach Janta Party Abhijeet Dipke) सोशल मिडीयावरून देखील त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.
या संपूर्ण आंदोलनाला कायदेशीर संरक्षण मिळवून देण्यासाठी अभिजित दीपके यांनी महाराष्ट्रातील काही व्यक्तींची मदत घेतली आहे. प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांच्याशी संपर्क साधला आहे. वकील सरोदे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, दीपके यांचा कोणताही नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा हेतू नसून केवळ लोकशाही मार्गाने जनआंदोलन उभारण्याचा त्यांचं ध्येय असल्याचे सांगितले. या आंदोलनात देशातील नामांकित विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. यामध्ये प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी सोनम वांगचूक, ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांसारख्या दिग्गजांना निमंत्रित बोलावण्यात आले आहे.(Cockroach Janta Party Abhijeet Dipke)
दुसरीकडे, अभिजित यांच्या वाढत्या राजकीय आणि सामाजिक सक्रियतेमुळे त्यांचे आई-वडील अत्यंत चिंतेत आहेत. त्यांच्या आई अनिता दिपके यांनी माध्यमांशी बोलताना आपली भीती व्यक्त केली. आपल्या मुलाने राजकारणाच्या आणि आंदोलनाच्या या चक्रव्यूहात न पडता, अमेरिकेतील त्याच्या उज्ज्वल व्यावसायिक कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. आता सर्वांचे लक्ष ६ जूनकडे लागले असून, अभिजित दीपके दिल्लीत उतरल्यानंतर या आंदोलनाला प्रशासनाकडून कशी प्रतिक्रिया मिळते आणि या मोहिमेला लोकांचा किती पाठिंबा मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
