छत्रपती संभाजीनगर; संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) मोठी बातमी समोर आली आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar)  ठाकरे गटात मोठी फुट पडली आहे, जिल्हा परिषदेच्या विशेष समित्यांच्या निवडणुकीत व्हीप झुगारण्यात आला आहे, निवडणुकीपासून दूर राहण्याचा व्हीप अंबादास दानवेंकडून (Ambadas Danve) बजावण्यात आला होता, मात्र कृष्णा डोंणगावकर (Krishna Dongavkar) , निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत, त्यांनी अर्जही दाखल केला आहे, कृष्णा डोंणगावकर शिवसेना शिंदे गटाच्या खासदार संदिपान भुमरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत, भाजपाशी युती होत नसेत तर शिवसेनेने मदत करावी असे आवाहन कृष्णा डोंणगावकर यांनी केले आहे, त्यामुळे आता त्यांनी पक्षाचा व्हीप जुगारला आहे अशी माहिती समोर आली आहे, त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर मध्ये राजकीय वर्तुळात मोठी फूट पडल्याचं दिसून येत आहे.

Continues below advertisement

छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) जिल्हा परिषदेच्या सभापती पदासाठी निवडणूक आज होत आहे, त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून कोणालाही मतदान करू नये असा व्हीप जारी केला होता. मात्र तो व्हीप जुगारून कृष्णा डोंणगावकर  (Krishna Dongavkar) यांनी अर्ज खरेदी केला आहे, आणि आपल्याला पाठिंबा द्यावा यासाठी कृष्णा डोंणगावकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्याकडे गेले होते, तुमचा आणि भाजपच पटत नाही तर तुम्ही गैरहजर न राहता तुम्ही मला मतदान करा अशा प्रकारचे कृष्णा डोंणगावकर यांनी आवाहन केले आहे, या सभापती पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला एकनाथ शिंदे यांची शिवसेना मदत करते का? हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, असं जरी असलं तरी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपा यामध्ये अंतर किती वाढले हे दर्शवणारी या घटना आहे, आज नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे, कृष्णा डोंणगावकर यांनी अर्ज खरेदी केला आहे, बारा वाजेपर्यंत त्यांना तो दाखल करायचा आहे. ते पाठिंबा मागण्यासाठी शिवसेनेकडे गेले होते, या निवडणुकीत काय समीकरणात जुळतात हे दुपारी दोन वाजेपर्यंत स्पष्ट होईल.

Continues below advertisement